मंगळवार, १८ मे, २०२१

प्रगती कि अधोगती....


माझ्या लहानपणी जेव्हा ग्रहण असायचे तेव्हा "दे दान सुटे गिरांन...." असं म्हणत बरीच लोक यायची. माझी आई आधीच तय्यारी करून ठेवायची, कपडे, चादरी, धान्य वगैरे. ग्रहण सुटलं कि ताबडतोब पाणी सोडायचे म्हणजे आंघोळी व्हायच्या, पिण्याचं पाणी भरलं जायचं, स्वयंपाक सुरु व्हायचा . ग्रहण काळात आई जप करत बसायची. ग्रहण काळात खाद्य पदार्थ करून ठेवले जायचे नाही. ग्रहण सुटल्यावर ताजे तयार व्हायचे. त्यावेळी भरमसाठ रेस्टॉरंट्स नव्हती, घरीच खाणं होत असे, त्यामुळे मला माहित नाही रेस्टॉरंट्स मध्ये कसे काय करत होते ग्रहण काळात. पण आज सकाळ पासूनच काहीही बदल दिसलाच नाही. सगळेच जण कामाला बाहेर पडले, सर्वत्र नेहेमी प्रमाणेच वर्दळ चालू होत,मुलं शाळेत जात होती, कचेरीत व्यवस्थित उपस्थिती होती, घरून डब्बा आणण्यात आला होता, जरा आश्चर्यच वाटलं मला. विज्ञानाची मुलं / लोक पण जर वातावरणात होणार बदल स्वीकार करत नसतील तर अवघड आहे. प्रगतीच्या नावावर म्हणजे कचेरीतील काम, शाळा हे सगळं महत्वाचं का ग्रहण काळातले बदल. काय हरकत आहे ज्या संस्थांना सुट्टी देता येत असेल तर, कधीतरी तर येतं ग्रहण. अर्थात हा फार मोठा विषय आहे, आणि मी त्यातली तज्ञ पण नाही. पण वाटलं लिहावंसं....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...