रविवार, १६ मे, २०२१

माझे उत्साही विद्यार्थी

मागल्या आठवड्यात आमच्या विद्यालयात "तांत्रिक-उत्सव" (Tech-Fest) साजरा केला. त्याचाच एक भाग म्हणून अचानक विद्यार्थिनींनी बिंगो खेळायचं ठरवलं आणि शिक्षक / शिक्षकेतर वर्गाला आमंत्रण दिल. पोचले मी वेळेआधीच. उत्साहाने भाग घेतला, पुन्हा एकदा समजावून घेतलं कि कसं खेळायचं, कारण मला कुठेही बिंगो चा बोर्ड आणि गोट्या नाही दिसल्या. म्हटलं काही नवीन पद्धत आली आहे का, कारण मी जवळपास १६ वर्षा पूर्वी खेळले होते बिंगो. ह्या वेळी बिंगोचे कार्ड्स विद्यार्थांनी प्रिंट केले होते कागदावर, आणि मोबाईल वापरून वेगवेगळे आकडे काढत होते, आधुनिक पद्धतीने. अहाहा. खेळायला भलतीच मजा आली. मोबाइल अँप फारच फटाफट आकडे काढत होते आणि तेवढ्याच गतीने आकडे शोधायचे, ओळ झाली का ते बघायचं, बिंगोतलं अक्षर मिटवायचं अशी कसरत करत मी जिंकले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. इतका छान अनुभव होता ना, मज्जा आली. सगळ्या विद्यार्थ्यांना शतश: धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...