अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे
हि, माझी मुलं अगदी तान्ही होती तेव्हाची. आणि
अर्थात त्यानंतर साधारणतः एक दिड वर्षाची होईस्तो पर्यन्त मी हाच उपाय करत होते म्हणून त्याची प्रकर्षाने आठवण झाली. तर त्याच असं झालं कि माझी मुलं काही दिवसांचीच असतांना एक उत्साही उच्च शिक्षित जोडपं आलं त्यांना बघायला / आम्हाला भेटायला. येते वेळी आम्हाला अजिबात कल्पना दिली नाही आणि सर्दी घेऊनच आले. अर्थात दोन्ही मुलांना त्यांच्यामुळे किंबहुना प्रतिकारशक्ती नसल्यामुळे ताबडतोब सर्दी झाली. डॉक्टरने एक घरगुती उपाय सांगितला कि छोट्याश्या न्हाणी घरात गरम पाण्याची वाफ साठू द्यायची आणि त्यात भरपूर व्हिक्स घालायचं आणि मुलांना घेऊन उभ राहायचं / बसायचं म्हणजे त्या व्हिक्स च्या वाफेने त्यांना पट्टाकिनी बर वाटेल. तर तो यशश्वी प्रयोग मी अनेक वर्ष केला. कारण मुलांच्या नाजूक कातडीवर व्हिक्स लावू नये म्हणे. एखाद वर्षाचे झाल्यावर मग मी त्यांच्या कपड्यांवर लावू लागले व्हिक्स, सरते शेवटी व्हिक्सचा औषधीयुक्त सुगंध हाच महत्वाचा, नाही का?
परवा काय
झालं कि माझं बादलीत काढलेले आंघोळीचं पाणी फारच कडत्त तापलं होत आणि मला जरा उशीरच झाला अंघोळीला जायला. छोट न्हाणी घर असल्यामुळे आणि दार लावून घेतल्या मूळे, जेव्हा मी दार उघडलं तेव्हा मला तो जुना / ऐतिहासिक बाष्प इफेक्ट जाणवला आणि सगळ्या गोड आठवणी जाग्या झाल्या.
माझ्या लहान मुलांना न्हाणी घरात घेऊन उभं
राहायचं म्हणजे मला
जय्यत तयारी करावी लागायची. थोडीशी खेळणी ठेवावी लागायची, आरश्यावर काहीबाही लिहावं लागायचे, पाण्याशी खेळावं लागायचं, त्याच्या खेळण्यातल्या साथीदारांना आंघोळ घालावी लागायची, उफ्फ.
एखादा चित्रपट बघावं असच
झालं मला
त्या दिवशी. बरच
झालं आंघोळीला उशिरा गेले ते.
किती कित्ती छोट्या छोट्या आठवणी आहेत माझ्या आणि
माझ्या मुलांच्या, आईगं.
रविवार, १६ मे, २०२१
कडत्त पाणी ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा