हे एका नवीन मराठी चित्रपटाचे घोषवाक्य आहे. त्याच नाव आहे "प्रवास". दिग्गज "पद्मिनी कोल्हापुरे",
"अशोक सराफ" आणि
अनेक कलावंतांनी नटलेला असा
हा चित्रपट. "जे शेष आहे ते विशेष आहे... " किती समर्पक शब्द आहेत हे, समर्पक पेक्षाही सगळ्यांच्याच उपयोगाचे आणि आवर्जून उपयोगात आणावे असेच. नाही का?
माझ्या दृष्टीने "रात
गयी
बात
गयी". जे झालंय, जे हातातून निघून गेलंय, जे भोगलंय... तो भूतकाळ. ते प्रयन्तपूर्वक विसरून पुढे जाणेच अत्यावश्यकच आहे. उरलेले पैसे, शारीरिक मानसिक शक्ती, डोक्यावरचे केस, आवडी, मित्र परिवार, स्वप्न ई. जास्त महत्वाचं. बरोबर ना? त्याचा अर्थ असा नाही कि नवीन गोष्टी करायच्याच नाहीत. करायच्याच. तो तर मानवी धर्मच आहे, पण जे हातात उरलं आहे ते मनःपूर्वक सांभाळणं, आताच क्षण... हे जास्त उपयुक्त. भूतकाळाबद्दल फक्त विचार करत बसलं तर संपलंच सगळं.
गेलेला क्षण जसा
आपला नसतो तसेच येणारी वेळ
हि / भविष्यकाळ आपल्या हातात नसतोच. त्यामुळे आताचा क्षण (वेळ) अतिशय महत्वाचा.
अतिशयच सुंदर, बहुउपयोगी संदेश देणारा असा
हा चित्रपट आहे, मला बघायची खूपच इच्छा आहे. बघूया कधी मुहूर्त मिळतोय ते.
घोषवाक्य वाचून, थोडक्यात झलक
बघूनच मी इतकी प्रभावित झाले आहे, चित्रपट बघितल्यावर काय होईल माहित नाही.
रविवार, १६ मे, २०२१
जे शेष आहे ते विशेष आहे...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा