आमच्या वेळी अत्तरच जास्त प्रसिद्ध होते, इतके कि अत्तर मिळण्याची वेगळी गल्लीच होती नागपुरात (पूजेचं अत्तर वेगळं, हळदी कुंकुवासाठी च वेगळं, आणि स्वतः वापरायचं त्याहून वेगळं बर का), जेथे अर्थात धूप, उदबत्या देखील मिळत होत्या. त्याउपर डांबराच्या गोळ्या काय ते ठिकठिकाणी ठेवलेल्या असायच्या कपाटात, दिवाणात आणि इतरत्र.
"Cherry on Cake" म्हणजे सुगंधी साबणाचे पाकीट... नवीन आंघोळीचं साबण काढलं कि त्याच पाकीट कपाटात नवीन / बाहेर घालून जायच्या कपड्यात घुसवून ठेवायचं. बाकी सर्रास सेंट / परफ्यूम वापरला जात नसे. किंबहुना कपड्याच्या साबणात आजकाल जसा सुगंधाचा मारा केला जातो तेही नव्हतं कधी. पण तरीही ह्या साबणांच्या पाकिटामुळे भलतंच ताजतवान वाटायचं दिवसभर. आज नवीन साबण काढतांना सर्व आठवणींना उजाळा मिळाला. अहाहा. आज ह्या छोट्याश्या कृतीची जागा पाणीयुक्त डिओने किंवा उग्र सेंटने घेतली आहे. विविध रंगीबेरंगी डांबर गोळ्या, फरशी साठी सुगंध वेगळा, न्हाणी घरासाठी त्याहून निराळा, कारसाठी अजूनच तिसरा, खोलीसाठी भलताच, मिटिंगच्या खोलीत पण, आणि सर्वत्रच अनेकविध सुगंधी उत्पादने उपलब्ध आहेत बाजारात आजकाल आणि (साबणाच्या पाकिटाच्या) छोट्याश्या सुंगधाला आता थारा उरला नाही आहे, कारण कामांचे तास वाढले आहेत, प्रदूषण, धूळ, ई. मुळे नवनवीन उत्पादने बाजारात येत आहेत आणि लोक वापरात देखील आहेत.
रविवार, १६ मे, २०२१
माझ्या कपाटाचा अनोखा सुगंध...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा