सोमवार, २४ मे, २०२१

११ गणपती दर्शन...


मी शाळेत असतांना माझी एक वर्ग मैत्रीण होती. त्या तिघी बहिणी होत्या. सगळ्यात मोठी जी ताई होती ती गणपती बसल्या दिवशी ११ गणपतीचे दर्शन घ्यायची, दुर्वा वाहायची . तीच्या बरोबर आमचीही मग वरात जायची. मला काय बडबड करायला आणि प्रसाद ग्रहण करायला तेव्हापासूनच फारच आवडायचं त्यामुळे मग काय मज्जाच मज्जा. अख्खी संध्याकाळ इकडून तिकडे.

आता फक्त कचेरीत येता जाता दिसतील तेवढेच गणपती दर्शन, अर्थात ११ झाले, कारण ठीक ठिकाणी बसवलेत गणपती. पण ती सर नाहीच. गेले ते दिन गेले. पण गेले ते फारच छान आठवणी देऊन गेलेत. अगदी दीड दिवसापासून ते थेट १० वा दिवसपर्यंत वाटली डाळ, वैविध्य आकाराचे / प्रकारचे मोदक, शेंगोळे, पंच खाद्य, नारळ काय काय भरभरून प्रसाद मिळायचा, अहाहा. चंगळच होती बुवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...