ह्या नावाची एक नवीन सिरीयल सुरु झाली आहे इतक्यातच एका मराठी वाहिनी वर. मला असं वाटतंय सोनी मराठी वाहिनी असावी. आणि त्याच वाहिनी वर वेगळ्या वेळी सिंधू नावाची पण मालिका दाखवत आहेत. दोन्ही मालिका नवीन आहेत आणि फारच ताज्या कारण त्यात सगळ्यांनीच अप्रतिम कामं केली आहेत आणि मुख्य भूमिकेत छोट्याश्या मुली आहेत. त्यामुळे मला सिंधू हि मालिका बघायला फारच आवडते आहे सध्या. सिंधू सुरु असतांना अधे मध्ये जिजा ची जाहिरात झळकते. आज हि तस्संच झालं आणि त्या जाहिरातीत एक वाक्य ऐकलं. जिजा ला आई म्हणते कि "अगं, लग्न ह्याच वयात होतात, आणि तू सासरी गेलीस कि नवऱ्याची आणि बाकी सर्व जबाबदारी नीट सांभाळता येते". त्यावर जीजा म्हणते कशी "मीच का लग्न करून जायचं? नवरा जर इथे आला लग्न करून तरीही मी त्यांची आणि राज्याची जबाबदारी घेणारच आहे. मग का मुलींनी सासरी जायचं?".
अगदी तसंच सिंधू पण म्हणते कि "मीच का बाबांचं घर सोडून जायचं?", मुलानी यावं कि माझ्या घरी राहायला. "
घर जावई ह्या संकल्पाने बद्दल नाही बोलत आहे मी. पण खरंच हि प्रथा ज्यांनी कोणी शोधून काढली मुलींनीच फक्त आपलं घर सोडून सासरी जाण्याची त्याने फक्त यावं माझ्या समोर, बास. बरीच वर्ष मुली गेल्या सासरी, आता
काही शतक
मुलांनी जाऊन बघावं. काय
हरकत आहे. आणि बहुतांशी सगळ्या मुली
सांभाळतात तश्या सगळ्या घरादाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून दाखवाव्यात मुलानी गपगुमान, तर मानलं.
ज्वलंत प्रश्न विचारलाय दोन्ही मालिकेत म्हणून म्हटलं लिहावं. अर्थात मालिकेत ठळक
उत्तर नाही गवसली त्या मुलींना, कदाचित त्या वयानी फारच लहान दाखवल्या आहेत, म्हणूनही असेल कदाचित.
Published on FB in Sep 2019.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा