मला तसं "बिग बाजार" "डी मार्ट" ई. ठिकाणी जायला प्रचंड आवडतं. नव-नवीन वस्तू बघायला मिळतात, नवीन पदार्थ ची मजा घेता येते. एका छताखाली बराच काही किंबहुना सर्व काही मिळत,मुलं पण फारच आवडीने येतात, मदत करतात, एकंदरीत महिन्यातून एकदा नक्की जावं असे ठिकाण आहे. पण सध्या माझ्या पायांमुळे मला जाताच येत नाही कारण खूप चालावं लागत अश्या ठिकाणी. म्हणून मग मी सोय बघितली आणि "बिग बाजार" च्या ऐवजी "बिग बास्केट"
ला स्विकारलं. वाढत्या वयाची मुलं घरी, आई नोकरी वाली आणि महिन्याभराचं सामान, है समीकरण म्हणजे भली मोठी यादी. काल एक काका आले "बिग बास्केट"
च सामान घेऊन. सगळ्या वस्तू ठेवल्या, घामाघूम झाले होते ते, पाणी तिळगुळ दिला, मग म्हणतात कसे, "ताई तुम्ही धन्य आहात, मी ह्या सगळ्या वस्तू जमा करतांनाच दमलो, तुम्ही कश्या आठवणीने मागवल्या? आश्चर्य आहे". मी त्यांना सांगितलं कि फक्त मीच नाही सगळ्याच गृहिणी हे करतात, मी काही वेगळं केलं नाही मुळीच.
ह्या टप्प्यावर आता कोणाही कडून प्रमाणपत्राची अपेक्षा नसतेच मुळी, पण अचानक असं न मागता कोणी सहज छोट्याश्या गोष्टी बद्दल कौतुक केलं कि नवा हुरूप येतो हे नक्की.
मंगळवार, १८ मे, २०२१
क्षुल्लक गोष्ट...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा