मागील सहा
महिने माझी बदली झाली होती, त्यामुळे मी फारच क्वचित माझ्या नेहेमीच्या कचेरीत येत होते, कधीतरी कामानिमित्य. ह्याच महिन्या पासून दररोज मूळ कचेरीत परतल्याच बऱ्याच जणांना माहित नाही आहे. तर आज मी माझ्या (अजूनही कायम) असलेल्या संथ गतीत चालत होते दुसऱ्या मजल्यावर, तर मागून कोणी तरी मला आवाज दिल्या सारखा वाटला, म्हणून थांबले. बघते तर आमच्याच कचेरीतला पण दुसऱ्या विभागात काम करणारा एक "प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant)" होता. मला म्हणाला "मॅडम तुम्हाला इतकं हळू चालताना बघवत नाही हो. काय झालाय नेमकं? गुढघा दुखतो का?" मग मी त्यांना माझी संपूर्ण भलीमोठी कथा थोडक्यात सांगितली. तर म्हणतात कसे "असं झालंय तर, मी का विचारलं कि जर गुढग्याचा काही त्रास असता तर मी माझ्या गावाला घेऊनच गेलो असतो आणि तुम्हाला पूर्ण बर केलं असत". आमच्या गावाला खूप उत्कृष्ट उपचार होतात आणि हमखास बरे होतातच लोक.
मला
इतकं छान
वाटलं म्हणून सांगते, कित्ती काळजी खरंच. आम्ही दोघे एका
विभागात काम
देखील करत
नाही, काय
ती फक्त तोंड ओळख. माणुसकी खरंच आहे अजूनही ह्या जगात.
त्यांना शतशः धन्यवाद देऊन मग मी निघाले, माझ्या संथ गतीने.
हि डिसेंबर २०१९ किंवा जानेवारी २०२० ची गोष्ट आहे मंडळी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा