सर्वार्थाने सक्षम व्यक्तिमत्व घडावं विद्यार्थ्यांचं म्हणून शैक्षणिक क्षेत्रातले सगळेच दिग्गज सतत कार्यरत आहेत. असंच व्यक्तिमत्व मग हवंस असतं बाहेरच्या जगात, नोकरीच्या ठिकाणी किंवा स्वतःचा व्यवसाय केला तर आणि समाजात वावरतांना देखील. आपत्ती व्यवस्थापन, नैतिकता आणि अश्याच धाटणीतले अनेक अभ्यासक्रम सुरु झाले आहेत काही गेले वर्ष. मला नेहेमीच दोन प्रश्न पडतात आणि ते मी इथे मांडायचे ठरवले आहे
१. माझे विद्यार्थी नेहेमीच हा प्रश्न विचारतात कि हे असे सगळे विषय का शिकायचे? हे शिकून आमच्या सारख्या तांत्रिक माणसाला काय फायदा? आणि बरेचसे. मी पण मग माझ्या नेहेमीच्या सवयीनुसार पोटतिडकीने अनेक उदाहरण देऊन समजावून सांगते. अपेक्षा आहे कि त्यांना ते पटलंय आणि त्यांनी ते प्रत्यक्षात उपयोगात आणलंय.
पदवी पर्यंतच्या टप्प्याला "कंफर्ट झोन" असं म्हणतात कारण त्यानंतरच बहुतेक मुलं बाहेरच्या जगात स्वतंत्रपणे वावरत आणि आपली प्रतिमा साकारण्याचा प्रयन्त करतात. हे करत असतांना प्रत्येकाला आजूबाजूच्या नवीन वातावरणाशी, कामाशी, लोकांशी जुळवून घ्यावं लागत नेहेमीच. टीम मधे काम करणं, वेळ पाळणं, कामात नाविन्य राखणं, तब्येत सांभाळणं, कुटुंबाला वेळ देणं ई. नॉन-टेकनिकल गोष्टींची तय्यारी हे विषयचं करून घेतात. असो.
२. प्रसिद्ध शाळेत शिकून, असे विषय पदवी पर्यंत शिकून आणि मोठाल्या ऑफिस मधे अनेक वर्ष काम करून,जग भ्रमण करून देखील असंख्य मंडळी अतिशयच विचित्र वागतात. त्यांच्या सवयी फारच अ-शिक्षितां सारख्या असतात, टेबल म्यानर्स, संवाद साधण्याची कला वगैरे सगळं फक्त पुस्तकात, प्रत्यक्षात मोठा शून्य. असं का होत असेल? शिक्षणाचा आणि विविध अनुभवांचा काहीच कायम स्वरूपी / शाश्वत / टिकणारा परिणाम का होत नाही ह्या सगळ्या मंडळींवर? कुठे कमी पडतात शैक्षणिक अधिकारी, शिक्षक वृंद (फिजिकल आणि व्हरचुअल), आई-वडील ई.
माझ्या संपूर्ण शिक्षणात असे विषय नव्हते, पण बाबा नेहेमी सांगायचे "समोरच्या प्रत्येक व्यक्ती कडून त्याचा चांगला गूण घ्या, सतत शिका ई." आणि आमच्या वेळी जे साधं सोप्प वातावरण होत, घराची दार सतत उघडी होती, सगळेच नेहेमीच वेलकम होते, आणि "चेरी ऑन केक" म्हणजे जेवणाच्या पंक्ती होत्या, हे सगळे चालते बोलते शिक्षक, विषय होते, ज्यामुळे सहज नकळत शिकलं जायचंच सतत. असो. चांगल्या बदलाची आशा करत मी माझे चार शब्द येथे पूर्ण करते.
मंगळवार, १८ मे, २०२१
आपत्ती व्यवस्थापन, नैतिकता
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा