मंगळवार, १८ मे, २०२१

डांगर

आमच्या नागपुरात आणि माझ्या घरात ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत.

१. लाल भोपळ्याचे अजून एक प्रचलित नाव
२. उडीद डाळीचा एक पदार्थ

माझी आई उडीद डाळ भाजून घ्यायची थोडीशी आणि ती साठवून ठेवत असे म्हणजे कधीही पट्टाकिनी वापरू शकतो. तर अशी भाजलेली डाळ अर्धवट दळून घ्यायची, मग त्यात चवीनुसार मीठ, तिखट / लाल मिरची, फोडणी, कोथिंबीर, किंचित साखर आणि दही घालून मस्त पट्टाकिनी हलवायचं आणि फस्त करायचं लगेचच. ह्याला कोशिंबीर म्हणा किंवा चटणी, फार उत्कृष्ट चविष्ट लागते, आणि झट कि पट होणारी साईड डिश. अहाहा.

आज लाल भोपळ्याचं भरीत करत असतांना हे सगळं आठवलं, म्हटलं लिहावं. अर्थात काही जण खरबूज ला पण डांगर म्हणतात. कदाचित कारण असं कि लाल भोपळ्याला पण डांगराचं फळ पण म्हटलं जात.

काय अप्रतिम भाषा आहे ना, एक शब्द अनेक अर्थ. सहीच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...