अगदी संध्याकाळ पासून डास आत येऊ नये म्हणून, अंधार पडल्यावर आपण जनरली सगळ्या दार खिडक्या बंद करतो, जाळी लावतो. तरीही पण रात्रभर सगळं बंद असत त्यामुळे सकाळी मला सगळ्या दार खिडक्या उघडायला फा$$$$र आवडतात "क्रॉस वेंटिलेशन" करता आवश्यक आहे आणि सकाळची ताजी शुद्ध हवा घरात येणे आवश्यकच आहे असं मला वाटत. तर आज सकाळी जेव्हा मी मागचं पुढचं दार उघडलं तेव्हा सहज मनात आलेला विचार येथे मांडत आहे.
हवा आणि पाण्याची जरी खासियत असली कि कुठूनही ते आपली वाट शोधून काढतातच तरीही मला प्रकर्षाने जाणवलं, जणू काही आज वारा / हवा माझ्याशी हितगुज करू इच्छिते, तिचं मनोगत मांडू पाहते. मुक्त हवेला मुक्तपणेच बागडायला आवडतं असणार नक्कीच. त्यामुळे जेव्हा आपण (मनुष्य) नवीन घर किंवा फ्लॅट सिस्टिम च, ऑफिस च बांधकाम काढलं कि सर्वप्रथम त्या धरती आईला, झाडं आजूबाजूला असली तर त्यांच्या मुळांना / त्यांना देखील, सरपटणाऱ्या मोठ्या / छोट्या जीवांना आणि त्यानंतर हवेला वाटत असणार कि "काय हा माणूस, आता नवीन बांधकाम, देवा, किती मोठं होणार हे? किती खोल? आमची इतक्या वर्षाची वस्ती कुठे जाणार आता?
वारा: मी मग कशी वाट काढू? प्रत्येक माणसाच्या श्वासापर्यंत पोचण्यास मला वेगळी धडपड करावी लागणार, क्रॉस वेंटिलेशन महत्वाचं आहे असं मी ह्याच माणसाच्या तोंडून ऐकलं आहे, कुठे असतील दरवाजे खिडकी?" ई. किती फ़्लेझीबल राहावं लागत असेल नाही हवेला कारण प्रत्येक बिल्डिंग चा आकार प्रकार वेगळा, आणि हे सगळं मनोगत प्रत्येक नवीन बांधकामाच्या वेळी व्यक्त होणार / होत असणार अप्रत्यक्ष पणे. आशा करते कि हि हाक, हे मनोगत वरिष्ठांपर्यंत पोचावं आणि चांगला बदल घडलेला दृष्टीपथात पडावा लवकरच. प्रत्येक घटक अतिमहत्त्वाचा आहे, आणि मुख्यतः हे सगळे नैसर्गिक घटक मानवनिर्मित नाहीत, मग तर काळजी घेणे अत्यावश्यकच आहे.
सोमवार, १७ मे, २०२१
क्रॉस वेंटिलेशन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा