सोमवार, १७ मे, २०२१

अजीब दास्तां है ये

 अजीब दास्तां है ये
कहाँ शुरू कहाँ खतम
ये मंज़िलें है कौन सी
वो समझ सके हम....

आज मला असच काहीस झालं, किंबहुना मी अनुभवलं. एक आंतरदेशीय ख्यातीचे तज्ञ् आले होते आमच्या विद्यापीठात, आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्या करता. ते अस्खलित तास बोलत होते,वैविध्य अनुभव कथन करत होते, पुढे काय अजून करू शकतो हे हि प्रकर्षाने सांगत होते आणि आमचे विद्यार्थी ज्ञानार्जन करत होते, थंड हवेत बसून. त्यात एका विद्यार्थ्या कडे एक आधुनिक स्टील ची पाण्याची बाटली होती, पाण्याची, त्याला भली मोठी साखळी तत्सम कडी होती आणि ती कडी त्या बाटलीवर पाणी पितांना, झाकण काढताना, लावतांना आपटत होती, आणि विचित्र आवाज करत होती. त्याच एका बाटलीतून जवळपास विद्यार्थी एका मागून एक पाणी पीत होते अनेक वेळा त्या तासात. देवा. नको वाटला तो आवाज. कारण असे कि बोलत ते तज्ञ् होते आणि घसा ह्याचा कोरडा पडत होता वारंवार. एखाद वेळा तहान लागण स्वाभाविकच आहे. सतत म्हणजे कळत नाही कि विद्यार्थी खरंच ज्ञानार्जन करायला बसले आहेत का नाही? इतक्या दुरून आलेल्या माणसाला जरा शांतपणे ऐकाच सोडून ह्यांच आपलं भलतंच. असो. "अजीब दास्तां है ये..." हेच खरं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...