रुखवत हि फारच अवर्णनीय अशी परंपरा आहे महाराष्ट्रात. ह्यात सगळ्या मुलीच्या कलागुणांना प्रदर्शित करण्याचा वाव मिळतो आणि बाकी मुलींना त्यातून प्रोत्साहन, आणि नव नवीन कल्पना सुचतात, पाहायला मिळतात. बारश्यात असलेलं रुखवत हे आई, आजी, मावशी आणि बाकी इतर मैत्रणी, नातेवाईक मंडळींच्या प्रेमाचं प्रतीक, माझ्या दृष्टीने. लग्नातील रुखवत म्हणजे प्रामुख्याने नववधूने कलात्मक दृष्टीने केलेले विविध प्रकार, अर्थात ह्यातही तिला मैत्रिणी, आई, आजी, आणि इतर नातेवाईक मदत करत असतीलच. हा रुखवताच घाट जुन्या काळी प्रकर्षाने (आणि आज थोड्या प्रमाणात) घातला जायचा कारण तेव्हा सर्वत्र कलात्मक वस्तू सहज उपलब्ध नसायच्या आणि अर्थात मुलगी किती गुणांची हे हि दाखवता यायचं. असो.
माझ्या नातीच "स्वराचं" आज बारस होत. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार आज हि बारश्यात रुखवत उत्कृष्ट आणि पारंपरिक पद्धतीने मांडलं होत. अनेकविध झबली टोपडी, दुपटी, अतिशय गोड पिटकुले मोजे,बाळाचे विविध फोटो आणि बरच काही वस्तुंनी ते रुखवत सजवलं होत. सगळ्यात महत्वाची आणि आकर्षणाची वस्तू म्हणजे खेळभांडी. ती खेळभांडी जरा मला वेगळीच वाटली, बहुतेक तांब्याची असावीत. आकारही वेगळा मोठा होता आणि सेट मध्ये अनेक घागरी होत्या. मी आज पर्यंत असा सेट कधीच पहिला नव्हता. मग कळलं कि ह्या खेळभांड्यानी स्वराचे बाबा, आत्या आणि त्यावेळची मित्र मंडळी खेळत होती म्हणे. बघा किती वर्षा पूर्वीचे खेळ होते ते आणि स्वराच्या आजीने ते जपून ठेवले आहेत अजूनही. धन्य आहेत आजी खरंच. मी स्वतः आणि माझ्या सर्व नोकरी करणाऱ्या मैत्रिणी नेहेमीच म्हणतात कि रोजच्या कामांनाच वेळ पुरत नाही आणि बरच काही, स्वराच्या आजीने त्या काळी नोकरी करून, मुलांना उत्कृष्ट पद्धतीने वेळ देऊन, घरातलं सगळं करून हा लहानपणीचा ठेवा कसा जपला असेल? महद आश्चर्यच आहे. धन्य त्या आजी आणि फारच नशीबवान स्वरा.
सोमवार, १७ मे, २०२१
बारश्यातलं रुखवत...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा