हि म्हण मी एवढयातच ऐकली आणि खरोखर डोळ्यात पाणीच उभं राहील. माझे आणि बाकी सगळे ओळखीतले, गोष्टीतले आणि आजूबाजूला बघितलेले बाबा आठवले. ज्याने कोणी हि म्हण तयार केली आहे त्याला प्रणाम.
पण त्याच बरोबर मला आज विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाही डोळ्यासमोर आल्या. त्या हि सकाळी बरंच लवकर बांधून नेलेला थंड डब्बा च खातात, नाही का?
आजकाल शाळेत जाणारी मुलं, ज्यांची शाळा बराच वेळ
असते, घरापासून दूर
असते, आणि
जे डब्बा घरून घेऊन जातात ते हि थंडच डब्बा खातात. नाही का? आमच्या वेळी श्रावण सोमवारी लवकर शाळा सुटायची, म्हणजे घरी लवकर पोचून गरम गरम खाता येई उपवासाच्या दिवशी, आता असं बघायला देखील मिळत नाही. माझी शाळा इतकी जवळ होती म्हणून सांगते कि मी छोट्या सुट्टीत घरीच येत असे, धावत पळत, कित्येक वर्ष. आता मुलांना शाळेच्या वेळेत घरी रोज सोडणं ... कल्पनाही करवत नाही. असो.
बाबा म्हणजे कुटुंब प्रमुख, कुटुंबाची छाया, आणि
व्यवहारीक दृष्ट्या कुटुंबाचं पालन पोषण करणारा भक्कम आधार स्तंभ. हे जगमान्य आहेच. पण आजकाल महिला कमी नाहीत. मुलांना अभ्यास आणि स्पर्धा इतक्या आहेत कि त्यांनाही कमी लेखून चालणार नाहीच. त्यामुळे सगळेच महत्वाचे, माझ्या दृष्टिकोनातून. आपआपल्या परीने, जशी गरज असेल तसे सगळेच अपार कष्ट करतात, जुळवून घेतात, कामाच्या दिवशी थंड डबा खातात म्हणून एक कुटुंब उभं राहत. तुम्हाला काय वाटत ह्या बाबतीत मित्रानो...
सोमवार, १७ मे, २०२१
"बाबा थंड डबा खातो म्हणजे कुटुंबाला गरम जेवता येईल"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा