आजच
सकाळी माझ्या मुलांशी झालेलं संभाषण म्हणजे जिम
च महत्व. मी ठरली शिक्षिका, नवीन विषय मिळाला मला, मग सोडते कि काय. सुरु झाले ताबडतोब.
माझ्या मते
भारतात जिम
ला जायची गरजच नाही. योग, प्राणायाम आणि घरची कामच पुरेशी आहेत. त्यात आपल्याकडे सगळे क्रतु देखील इतके पूरक असतात, कि आपण घरा बाहेर मोकळ्या हवेत काम करू शकतो, फिरू शकतो, ऊन मिळत आणि बराच काही. ज्या देशात काही महिने सलग बर्फ पडतो, त्याआधी अतिशयच थंडी असते, अशांना जिम ची गरज भासते. आपण फारच नशीबवान आहोत कि कृत्रिम पद्धतीने व्यायाम करायची गरज नाहीच. आणि कृत्रिम पद्धतीने करायचाच झाला तर त्यात सातत्य पाहिजेच. नाहीतर त्याचे परिणाम लगेच दिसतात. जिम ने कदाचित फक्त शारीरिक व्यायाम होत असावा, पण योग् + प्राणायाम आपल्याला मानसिक आरोग्य हि प्रदान करते, जे आजकालच्या पिढीला फारच आवश्यक आहे. आणि जर काही कारणास्तव योग साधनेत खंड पडला तर त्याचे वाईट परिणाम अजिबात होत नाहीत. थोडक्यात आमचं असं संभाषण झालं आज, बाकी कदाचित संध्याकाळी होईलच. बघू कितपत उपयोगी पडतंय ते.
सोमवार, १७ मे, २०२१
जिम संस्कृती...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा