सध्या पुण्यात चांगलीच थंडी पडली आहे, त्यात सकाळी तर तापमान फारच कमी असत. आठवड्यातले काही दिवस माझी प्रयोग शाळा पाहिल्याचं तासाला असते. तर अश्या गार वातावरणात देखील माझे विद्यार्थी आल्या आल्या लागलीच वातानुकूलित यंत्रणा चालू करतात, एक नाही तर दोन दोन. देवा. मी तर जाड जूड जॅकेट घालून जाते पण तरीही महद आश्चर्य ह्याच वाटत कि त्या मुलांना थंडी कशी वाजत नाही? बरं बहुतेक सगळीच मुलं मुली खरंच काही गरम कपडे, स्वेटर ई. घालून येत नाहीत. गेंडा कातडीचे आहेत ह्यात काही वाद नाहीच. थंडी वाजते कि नाही हा भाग जरी थोडासा बाजूला ठेवला तरी दोन वातानुकूलित यंत्रणा चालू करण्याची गरज आहे का थंडीच्या दिवसात? आणि सगळेच सारखे. बाप रे. अवघड आहे सगळं, कदाचित माझंच. आजकालचे संगणक फार काही गरम होत नाहीत आधी सारखे, कि त्यांना थंड करण्यासाठी गार जागा लागते वगैरे. असं काहीच नाही. बर AC बंद करा म्हटलं कि पंखे चालू होतात थेट ५ वर, हे राम. खूपच गम्मत वाटते सगळ्याच गोष्टींची. असो, पुढे त्यांना अगदी रोज सतत अश्याच थंड कचेरीत बसावंच लागेल. त्याची सवय करताहेत कदाचित हि पोरं.
सोमवार, १७ मे, २०२१
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा