सोमवार, १७ मे, २०२१

अवलिया प्राध्यापक

मी सध्या एका प्राध्यापका सोबत विद्यापीठात येते जाते, रोज. हे प्राध्यापक एवढ्यातच आले आहेत, तरी झाले असतील एक महिने. माझ्या घरा जवळ तर नाही पण त्याच भागात राहतात त्यामुळे आम्ही ठरवलं एकत्र यायचं ते. आज मला जरा लवकर निघायचं होत संध्याकाळी. मी त्यांना तशी विनंती केली आणि त्यांनीही ती सहज मान्य केली. आम्ही रोज सकाळी बरेच लवकर कचेरीत पोचतो त्यामुळे एखाद्या दिवशी परवानगी मिळते लवकर निघायला. माझ्या कासवाच्या गतीने अनेक विषयांवर गप्पा मारत आम्ही गाडीतळाजवळ पोहचलो. मग ते गाडी काढायला गेले आणि मी रस्त्यावर उभी होते त्यांची वाट बघत. तेवढ्यात प्राध्यापकांसारखीच गाडी माझ्या समोरुन वेगात गेली. आणि बघते तर काय सर मला सोडून निघून गेले होते. मग मी त्यांना फोन लावला, आणि बऱ्याच रिंग गेल्या तरी ते उचलेनात. म्हटलं झालं आता. शोधा नवीन वाहन. पण देवाचीच कृपा शेवटच्या रिंग ला उचला एकदाचा फोन त्यांनी. आणि म्हटले बर झालं तुम्ही फोन केलात नाही तर मी सरळ घरी पोचलो असतो, तुम्हाला सोडून. अर्धा मिनिटात कस काय विसरू शकतो कोणी? धन्य ते प्राध्यापक. अवलियाच जणू. आपल्याच संशोधनाच्या विचारात गढलेले असतात. फार फार हसलो आम्ही पण आज ह्या प्रसंगामुळे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...