आज एकादशी, ठरल्याप्रमाणे आमच्या ब्राह्मण सांस्कृतिक समाज ह्या WA संघाचं सामूहिक श्री विष्णुसहस्त्रनाम पठाण होत. आग्रहाने करंदीकर कुटुंबाने आम्हा सगळ्यांना बोलावले होते. सुरेख पठाण झाल्यावर पोटभर अल्पोपहार होता. चि. वेदांत, अस्मिता आणि कौस्तुभ करंदीकर ह्यांचा मुलगा, साधारणतः ८-१० वर्षाचा (कदाचित) आहे. संपूर्ण दोन आवर्तन होईस्तोपर्यंत शांत पणे ऐकत बसला होता, अगदी शहाण्या मुलासारखा. कौतुकास्पद आहे हे. त्यानंतर अस्मिताने सांगितलं कि आज वेदांतचा वाढदिवस आहे. खूपच आश्चर्य वाटलं. नाहीतर आजकाची मुलं आपल्या मित्र मैत्रिणींना बोलावून फक्त पार्टीच करतात आणि प्रकर्षाने त्याच दिवशी. पण आज दोन्ही आजी आजोबांच्या उपस्थितीत पठणाचा कार्यक्रम झाला आणि त्यात सगळयांनी उत्साहानी भाग घेतला, वेदांत सहित. ह्यालाच म्हणतात खरे संस्कार, माझ्या दृष्टीने. फारच दुर्मिळ अनुभव होता माझ्या करता. सौ. अस्मिता आणि कौस्तुभ ला congratulations for parenting anniversary आणि वेदांतला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
सोमवार, १७ मे, २०२१
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा