सोमवार, १७ मे, २०२१

कामाची ऊर्जा

मध्यंतरी सगळं पुन्हा सगळं सुरळीत सुरु झालं होत तेव्हा का कधीतरी माझ्या कडे येणाऱ्या मावशी मला म्हणतात कश्या

मावशी: "ताई, तुम्ही फारच इकडे तिकडे करत असता आणि काम पण घरची सांभाळता, व्यायाम करता, नाही तर काही बाया ढिम्म हालत नाहीत जागेवरून.... (आणि त्यांची पोपटपंची चालूच होती आणि माझे छोटेमोठे उद्योग)".

त्यावर मग मी म्हटलं "कोणीही बसून राहत नाही मावशी, सगळ्याच सतत कामात असतातच, मी तुम्हाला असंख्य उदाहरण देऊ शकते. मुळात मुलीच्या स्वभावात असतंच हे आणि त्यात मला सांगा मी काय करू फक्त बसून राहून, सोफा तोडत?".

मावशी: "नाही हो, मी काम करते कित्ती वर्ष झाले अनेक घरी, मला माहिती आहे ना",

मी: "तुम्हाला माहिती आहे का आमच्या ऑफिस मधे तर जितक्या जणी आहेत त्या सगळ्याच वाघ आहेत कामाला, त्या घरचं दारच सगळी काम अविरत करतच असतात, अनेक वर्ष मी पाहाते आहे ना, मला हि कामाची स्फूर्ती कोणाकडून मिळते ते कळलं का आता, हो त्या सगळ्या माझ्या सख्यांकडून, भरभरून. आणि आमच्या ऑफिस मध्ये सगळ्या घरच्या फार फायनान्शिअल स्थिर असून देखील घरची काम, स्वयंपाक, सण, व्रत आणि सगळंच करतात."

आणि असा आमचा संवाद चालू राहिला, काम करता करता बडबड....

त्यामुळे माझ्या सगळ्या ऑफिस मधल्या तरुण मैत्रिणींना मनापासून धन्यवाद, तुम्हीच सगळ्या माझ्या स्रोत आहात ऊर्जेच्या, आणि अश्याच राहा, हसण्यात एक नंबर, हाताची चव तर जागावेगळीच आणि उत्साहाचा झरा कायम. अहाहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...