इतकं सुंदर घर, प्रचंड मोठं, त्यात एक काका, काकू, छोटी मुलगी, तिची आई, त्यांचा केअर टेकर आणि मी. सगळे च्या सगळे मिशीगन शहरात होतो आम्ही. ती छोटी मुलगी दंगा मस्ती करत होती, मी त्या काका काकूंना टीव्ही लावून दिला आणि त्या छोट्या मुलीची आई पुन्हा एकदा आई होणार होती, कधीही तो दिवस येणार होता. मी तेथे का होती? मला काहीच माहित नाही, पण इतकं छान / भन्नाट वाटलं होत मला तेव्हा आणि आत्ता वाटतंय लिहितांना अक्षरश: अंगावर काटे आलेत, कारण? अहो मी चक्क अनुष्का बरोबर तिच्या महालात होते. कोण अनुष्का म्हणून विचारताय? अहो आपली विराट ची, हो हो तीच. कित्ती तास मी तेथे होते माझं मलाच माहित नाही. पण लई भारी वाटलं, आणि थोडसं अस्वस्थ पण. म्हणून पाणी पिऊन आले आणि पुन्हा डोकं टेकलं उशीला कि सुरु तेच पुराण. काहीही हं. काय संबंध? आणि मी लांब च लांब दिवसाच्या सरते शेवटी अंथरुणावर पडले रे पडले कि "ब्रह्मानंदी" लागली असते. त्यामुळे मिशीगन आणि अश्या मोठ्या व्यक्ती बद्दल विचार करणं तर कोसो दूर, मग मला हे इतके तास स्वप्न का दिसलं? सपशेल खोट आहे हे "मनी वसे ते स्वप्नी दिसे" म्हणे, काहीही म्हणजे काहीही.
तुम्हाला काय वाटत मंडळी? कोणाचा स्वप्नांचा अभ्यास असेल तर कळवा मला. ओके.
सोमवार, १७ मे, २०२१
"मनी असे ते स्वप्नी दिसे"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा