सोमवार, १७ मे, २०२१

मोबाईल च्या प्रगतीचे कारण

दररोज सकाळी / पहाटे जेव्हा माणसाला जाग येते तेव्हा त्याने आधी आपल्या दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे. जमल्यास आणि येत असल्यास "कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती......... प्रभाते कर दर्शनमं", हा श्लोक म्हणूनच दिवसाची भव्य दिव्य सुरवात करावी. ह्याच कारण? मी असं ऐकलं आहे कि रात्रभर आपले डोळे बंद असतात, शांत असतात, रिलॅक्स झालेले असतात, तर त्यांना आपल्या ओंजळीची थोडीशी उष्णता द्यावी, डोळ्यावर आधी आपलेच दोन तळहात ठेवल्यामुळे एकदम प्रकाश दृष्टीस पडत नाही. हळू हळू डोळे उघडले श्लोक झाल्यावर मग तशी उजेडाची, दिवसाची आणि डोळे वापरण्याची सुरवात करावी म्हणजे आपलीच डोळ्यात साठवलेली ऊर्जा आपल्यालाच मिळते. पण जी लोक कसला श्लोक आणि कसलं काय, असं म्हणत असतील तर मग  .....

मग आपली म्हणजे प्रत्येकाची ऊर्जा दररोज न चुकता त्या आपल्या नवीन अवयवाला मिळते आहे आणि म्हणूनच तो माझ्या दृष्टीने आज इतक्या लवकर इतकी प्रगती करू शकला आणि कुठच्या कुठे पोचलाय पठ्ठा, देवा. "आपल्यासाठी तो का त्याच्यासाठी आपण?".

तंत्रज्ञानामुळे, संशोधनामुळे तर आहेच प्रगती, काही वादच नाही, पण हि जी रोजची ऊर्जा मिळते आहे ती कुठे तरी जबरदस्त कारणीभूत आहे, असं मला प्रकर्षाने आज पहाटे जाणवलं म्हणून हा पंक्ती प्रपंच. "आपला हात जगन्नाथ, थोडे सकाळचे सेकंद द्या कि आपल्या नावावर लोकहो, मोबाइलला नाही, विनंती आहे".


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...