"पोट दुखेस्तोवर हासणे" म्हणजे काय?
हे मला पुन्हा एकदा कळलं. फारच वेगळा आणि कधीही मी साधा विचार देखील केला नव्हता असे ओळीने प्रसंग घडले / नाविन्य पूर्ण शब्द ऐकले, म्हटलं लिहावं.
- "आंबे शिजले नाही आहे अजून", ("पिकले नाहीत" असं वाचावं कृपाकरुन),
- "कुकर लावतांना फक्त तांदळात पाणी घालायचं, कुकरमध्ये का?",
- "पुण्याचे म्हणून पुना गाडगीळ, पु. ना. गाडगीळ नाही", (आधीच्या काळी पुणे नव्हते म्हणत ना)
- "चहा वाहात होता, उतू जात नव्हता", ई. (गॅसवर चा चहा, गाळायच्या आधी, गॅस मोठा होता त्यामुळे वर आला)
बा$$$$$परे. अरे काय हे, मराठीचा आणि शब्द / अलंकारीत भाषेचा खून, धक्के होते मला, भुगा झाला माझ्या डोक्याचा. पण अतिशय मज्जा आली, असो. मला कुठे भन्नाट इंग्लिश किंवा अजून कुठली भाषा कुठे येते म्हणून. तसेच हे मराठी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा