शनिवार, २९ मे, २०२१

मेस

 हा शब्द इंग्लिश मधे पहिल्यांदा तय्यार झाला वापरला गेला तेव्हा त्याचा अर्थ "खाण्याचा एक भाग" / "पोरशन ऑफ फूड" असा होता. त्यानंतर अजून एक अर्थ पण समोर आला आणि तो मुळ फ्रेंच भाषेचा शब्द आणि त्याचा अपभ्रंश होता. फ्रेंच मधे मेस चा अर्थ "एक डिश" असा होतो म्हणे. त्याचं स्पेल्लिंग होत mets. असो. 

 मला काही दिवसापूर्वी मेस चा नवीन अर्थ समजला म्हणून लिहायला घेतलं. 
 
आमच्या नागपुरात माझा संबंध फक्त मटकी, चवळी, वाटाणे, हरभरे ई. कडधान्यांशीच आला अनेक वर्ष. राजम्याला आमच्या स्वयंपाक घरात स्थान नव्हतं तेव्हा. मी थोडीशी बाहेर पडल्यावर मग राजम्याशी ओळख झाली आणि पटली पण. ती इतकी पटली कि मग राजमा चावल, राजमा पराठा, काली दाल, नॅचोज, बरितो ई. सगळ्या पदार्थांमधला राजमा लै भारी वाटू लागला. राजम्याच्या प्रेमात पडले ते "टाको बेल" मुळेच. अहाहा. भन्नाट पदार्थ. ह्या जगा वेगळा माझ्यासाठी. 
 
"टाको बेल" म्हणजे थोडक्यात / प्रत्यक्षात राजमा + अनेक प्रकारचे पत्ता कोबी + चीझ वगैरे भरलेले कणसाच्या पिठापासून तय्यार केलेल्या शेल. अमेरिकेतली प्रसिद्ध, स्वस्त, फास्ट फूड प्रकारात मोडणारी, भारतीयांना आवडेल अशी, थोडीशी तिखट आणि अर्थात मी त्या ची फार मोठी भक्त. खूप वर्ष यथेच्छ एन्जॉय केलं तेथे असतांना, पण परत आल्यावर मिस करत होते, फारच. मग स्वतःच "टाको बेल" सुरु करावं असं पण मनात आलं पण धंदा कारण रक्तात नाही, त्यामुळे निमूट बसून राहिले. असो. काही दिवसांपूर्वी घरी केले "टाको बेल" आणि ब्लिंक ऑफ यान आय संपले सुद्धा. अतिशय मज्जा आली पण तेव्हा नक्की कळलं कि खाण्याच्या जागेला मेस का म्हणतात ते. देवा, ते शेल जे मी विकत आणले ते भले मोठे होते, त्यात जेव्हा फिलिंग भरलं आणि खायला सुरवात झाली तेव्हा सगळं इतस्ततः पडत होत. मी त्या कडे अजिबात लक्ष न देता ताव मारला हे वेगळं. पण इट वॉज अ टोटल मेस. सांडवत पण खावं कधी कधी नाही का? Source:lbb.in
Listen to this story on YouTube too: https://youtu.be/yrH-IdTfXB0

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...