मी एकदा माझ्या पिल्लाना घेऊन न्यू यॉर्क विमानतळावर होते, विमानात प्रवेश करतांना घडलेला हा प्रसंग.
माझी गुटगुटीत जुळी मुलं बघून विमानाच्या दारात उभ्या ठाकलेल्या प्रचंड उंच, देखण्या दोघांनी बोलायला सुरवात केली. कारण ती दोघेही जुळी होती, बहिण भाऊ एकाच विमान कंपनीसाठी काम करत होती. मग थोडक्यात पण त्यांनी त्यांची संपूर्ण कहाणी ऐकवली. अहाहा. माझा उत्साह गगनात मावत नव्हता, काय दिसत होती ती. भविष्य नक्कीच उज्जल आहे माझ्या देखील मुलांच देखील ह्याची पक्की खात्री झालीच. त्यातच भर पडली आणि मला एक फारच गोड एक साधारण ४-५ वर्षाची मुलगी दृष्टीपथात पडली आणि तिचे केस फार छान लांब होते. त्या केसांना तिच्या आईने बहुतेक छान विंसरून ठराविक अंतरावर एकाखाली एक रबर बँड्स लावले होते. असं मी पहिल्यांदाच बघितलं होत, आणि "लव्ह at फर्स्ट साईट" असं झालं माझं.
हि माझी पिल्लू नकट्या केसांची लवकर मोठी झाली, आणि सुरवातीपासूनच तिचे केस छान लांब होते. मग काय इतक्या वर्षाचं दडपून ठेवलेलं प्रेम ऊतू गेलं. मी सोडते कि काय, पण कमाल आहे हा, इतक्या वर्ष माझ्या लक्षात राहिली ती केशरचना. मी पण मग वर्णिकांची तशीच पण विविध रंगांच्या रबर बँड्स नि पोनी घालू लागले. अहाहा. मला, माझ्या लेकीला आणि बघणाऱ्यांना ते इतकं आवडू लागलं कि ज्याचं नाव ते. मग मी पुढे जाऊन रंगीबेरंगी ऐवजी थोडेसे किंचित चमकी असलेले रबर बँड्स आणले आणि अनेक प्रयोग अनेक वर्ष चालूच होते प्रिसाईझली तिला शिंग फुटे पर्यंत. देवा काय मज्जा येत असे,झटकीपट पण उत्कृष्ट दिमाखदार दिसणारी हेअर स्टाईल मिनिटात तय्यार.
आधी मी फक्त इंजिनियर च्या दृष्टिकोनातून एक सारख्या अंतरावरच बँड्स लावत असे, मग माझ्यातली कला जागी झाली आणि कधी लहान ते मोठे अंतर तर कधी उलट असे अनेक प्रयोग चालू झाले. त्यावेळी अनेक वाढदिवस, शाळेत कार्यक्रम आणि बरेच प्रसंग होते हे सगळं करायला. काय भन्नाट आठवणी देऊन गेलेत ते दिवस, अहाहा.
Listen to this story in my voice on YouTube: https://youtu.be/0jQxYovMPgM
Also find me on FB and Twitter.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा