शनिवार, २२ मे, २०२१

"आज मै उपर, आसमा नीचे"

असं काहीस झालाय मला आज. इतका भन्नाट दिवस सुरु झाला म्हणून सांगते. अहाहा, ह्या जगापलीकडला असा. काय झालं? सांगते सांगते. पेशंस.

४-५ वर्षांपूर्वी मी वायुवेगाने ऑफिस ला जात असतांना बहुतेक दररोज मी एका टोळी ला निरखत होते आणि त्या मला. आमची एकचं वेळ असायची, फक्त त्यांची थोडी सावकाश आणि माझी घाईची. असो, सरते शेवटी एकमेकांना फक्त बघण्यापासून (दृष्टिभेट) सुरु झालेला प्रवास, "नमस्कार-चमत्कार" च्या पुढे कधी गेला आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी कधी झालो हे समजलंच नाही. आणि आज तागायत हि मैत्री टिकून आहे झकास. आज मी चहाचा सकाळी घोट घेतला कि "प्रिती $$$$" म्हणून हाका ऐकू आल्या मला, जरा महद आश्चर्य वाटलं, डोकावून खिडकीतून बघते तर काय ह्याच माझ्या मैत्रिणी, मला भेटायला आल्या होत्या, प्रत्यक्ष, अहाहा, देवा, काय म्हणजे काय छान वाटलं म्हणून सांगते. रोज भेट होत होती आधी आणि आता इतक्या महिन्याच अंतर. थोड्याच वेळ तेही मस्त रस्त्यावर उभे राहूनच बोललो पण ते भन्नाट होत. सरप्राईझ फारच अप्रतिम होत माझ्या साठी. एकमेकिंना प्रत्यक्ष बघून, भेटून, बोलून वेगळीच ऊर्जा मिळाली. "आज मै उपर, आसमा नीचे" असं वाटलं / जाणवलं / अनुभवलं मी आज. आम्ही इतक्या कमी वेळा करता ते हि रस्त्यात भेटत असू सगळे दिवस नॉर्मल होते तेव्हा पण त्या थोड्या वेळात सगळ्याचा जगाची खबर घेतली जायची, सगळ्याच बडबड्या, मग काय विचारता. आमच्या वयातलं अंतर कधीच आडवं आलं नाहीच, त्यांनी मला सहज सामावून घेतलं. हे सगळं लिहितांना मला आमच्या विविध भेटी आत्ता देखील डोळ्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. "थोडक्यात गोडी" ह्याच ढळढळीत उदाहरणं आहे आमची मैत्री. लव्ह यू ऑल गर्ल्स.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...