आमच्या ग्रुप मधे किंवा जनरली नागपुरात "माठ" हा शब्द अगदी "ढ" व्यक्तिमत्वाची, किंवा ज्याला पट्टाकिनी एखादा जोक / इशारा नाही समजला तर म्हणत होतो आम्ही. तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच कि रांजण हि माठापेक्षा भली मोठी वस्तू आहे, पाणपोई पण ठिकठिकाणी रांजण वापरून उपलब्ध करून दिल्या जात असतं. आता एखादा जर माठा पेक्षा मठ्ठ आहे किंवा तसं दिसतंय तर मग पुढील उपाधी होती "रांजण". अस्पष्ट आठवतं त्या प्रमाणे गलेलठ्ठ व्यक्तिमत्वाला पण हे उपाधी मिळत असे. कुठे माठ, रांजण नावाची वस्तू आणि कुठे ह्या उपाध्या, त्या हि माणसाला दिलेल्या / वाहिलेल्या, काहीही म्हणजे काहीही. पण एकंदरीत असले शब्द वापरतांना आणि ऐकतांना देखील फारच मज्जा यायची, कित्ती पोट धरून हसायचो आम्ही. सॉरी, पण ते वय तसंच होत, का आम्ही दात काढत असू सतत कोणास ठाऊक. देवा. ह्या उन्हाळ्यात माठ काढून भरून वापरायला काढला तेव्हा मी पुन्हा एकदा माझ्या लेकरांना माझ्या सुरई, माठ आणि रांजण च्या आठवणी सांगितल्या आणि लिहायचं ठरवलं.
सुरई, माठ, रांजण ई. सगळे कष्ट करून इतक्या भयानक नागपूरच्या उन्हाळ्यात सगळ्याची तहान भागवतात थंड-गार पाणी देऊन, आणि आम्ही पोरं बघा असं सगळं चांगलं बोलायचं सोडून भलतंच, पण त्याच आठवणींमुळे आज मला ह्या चार ओळी लिहिता आल्या नं?
शनिवार, २२ मे, २०२१
रांजण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा