माझ्या लहानपणी आमच्या घरा जवळच एक छोटेखानी बेकरी होती आणि तेथे माझी आई मोजून कणिक, तूप, साखर आणि इतर जे जिन्नस लागतात ते सगळं देऊन यायची. दुसऱ्या दिवशी मग पुन्हा आम्ही दोघी जाऊन ताजी तय्यार कणकेची बिस्किटे घेऊन यायचो. डब्बाभरून, अहाहा, तो सुगंधच वेडा करत असे डब्बा उघडला कि. चहा, कॉफी, दूधा सोबत, नुसतं खायला, आल्या-गेलेल्यांना सहज देण्यासाठी उत्तम पर्याय.
काल मी आमच्या शेजारच्या घरगुती दुकानातून खूप दिवसांनी, वर्षांनी कणकेची बिस्किटे मागवली, आधी त्यावर ताव मारला आणि मग माझ्या लहानपणी ची चक्कर मारून आले मनातल्यामनात आणि आता म्हटलं लिहावं.
आई शपथ, काय साधे पण अप्रतिम दिवस होते ते. अर्थात दुकानातल्या ह्या बिस्किटांना माझ्या लहानपणी सारखी उत्कृष्ट ताजी लई भारी चव नव्हती पण असो "दुधाची तहान ताकावर".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा