गुरुवार, २० मे, २०२१

ऑल इन वन


माझ्या लहानपणी आमच्या नागपुरात दिनशा आईस्क्रीम चे प्रस्थ होत फार. तिथले सगळेच आईस्क्रीम भन्नाट असायचेच पण "थ्री इन वन" मला जाम आवडत असे. कारण त्यात एकावेळेस तीन स्वाद खायला मिळत असत. अहाहा. आता इतक्यावर्षानी इतके लिटर आईस्क्रीम खाल्यावर देखील तोंडाला प्रचंड पाणी सुटलंय.

आमच्याच नागपुरातली आणखी एक खासियत म्हणजे हल्दीराम, देवा. त्याच्या कडचे पण सगळेच्या सगळे पदार्थ म्हणजे ह्या जागावेगळेच. स्प्रेड केवढा असायचा मिठाया, कोरडे स्नॅक्स, ताजे पदार्थ अहाहा, आता मी हल्दीरामच्या दुकानात उभे आहे असं वाटतंय मला. त्यांच्या कडे "ऑल इन वन" नावाचे फरसाण होते ज्यात खूप प्रमाणात ड्राय फ्रुटस, आणि बरेच काही मिक्स. कशावर हि घालून खा (पोहे, उपमा, पिझ्झा), नुसते खा, भेळ करा सगळ्यात समरस होणार त्याची चव वाढवणाराच.

आताशा "ऑल इन वन" संगणक आले आहेत जे सी पी यू + मॉनिटर + (अनेकदा) टच स्क्रीन असे आहेत. भरपूर प्रकारचे ऑपशन्स असतात, सगळं एकत्र एका डिव्हाईस मधे, एकदम सडसडीत, दिसायला भन्नाट, सांभाळायला सोप्पे म्हणजे दोन तीन उपकरणे संभाळण्यापेक्षा एक बरे.

घड्याळ + गजर + मेल + फोटो + गाणी / रेडिओ + रेकॉर्डिंग आणि बरेच काही आहेच कि आपल्या मोबाईल मधे भरभरून "ऑल इन वन".

सगळ्या कंपन्या पण आजकाल त्यांचे एम्प्लॉयी पण "ऑल इन वन" असंच म्हणतात किंवा अपेक्षा करतात ना.

चला तर मग, आपण आहोतच मिक्स ऑफ ऑल, बेस्ट ऑफ ऑल आणि असेच राहुयात सगळ्यांशी आपल्या "ऑल इन वन" ग्याजेट सारखे, फरसाण सारखे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...