गुरुवार, २७ मे, २०२१

व्हर्चुअल "ठो"

मी अनेक वर्ष अनेक मुलांबरोबर "ठो" चा खेळ खेळली आहे. माझ्या मुलांबरोबर खेळतांना तो एक नवा भन्नाट अनुभव होता कारण बहुतेक प्रत्येक वेळी माझ्या एका कपाळावर दोन "ठो" मिळायचे. लहान होते तेव्हा धडपडत कुठेही कसेही "ठो". आणि माझ्या आईकडे असतांना का कुणास ठाऊक पण एक अलिखित नियम ऐकला होता कि "तीनदा "ठो" द्यायचा म्हणे". मग फक्त विचार करा माझं काय होत असेल. कधी मला जेव्हा अधेमधे आठवण होत असे तेव्हा "ठो" मी देणं, किंवा मागणं वेगळं पण माझ्या दोघांनाही प्रेम जेव्हा उतू जात असे तेव्हा तेव्हा मी वर म्हटल्याप्रमाणे जोरात "ठो" बसत होते, अनेक, कुठेही.

मधे बऱ्याच वर्षांची गॅप पडली आणि आताच्या ह्या "न्यू नॉर्मल" दिवसांमधे सगळंच आपण व्हर्चुअल अनुभवतो आहे, त्यात एक भर पडली आज. हो, अगदी बरोबर, आज मी "न भूतो न भविष्यती"  व्हर्चुअल "ठो" अनुभवाला, जबरदस्त.

जबरदस्त काय म्हणताय?, अहो तो मोबाईल, ते पिल्लू तिला दोन प्रकारचे "ठो" देता येतात, एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष. काय पिढी आहे, अहाहा. मग मी पण काय कमी आहे का, मी पण दिला तिला व्हर्चुअल "ठो". काय मज्जा आली. मेड माय डे. प्रत्यक्ष भेट जरा अवघड आहे सध्या आणि तितकीशी सुरक्षित पण नाही पिल्लू साठी, त्यामुळे आता काय "दुधाची तहान ताकावर", व्हर्चुअल "ठो" नेच पोट भरलं. मिळाला ना, बास. लव्ह यू टेकनॉलॉजि. आणि हो, हा व्हर्चुअल "ठो" मला माझ्या नातीने दिला हो, म्हणून तो अजून खास, गोड, ह्या जगा पलिकडला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...