माझ्या घरी लहानपणी पासून मी पाहिलं आहे, निरीक्षण केलं आहे कि उदाहरणार्थ भिंतीवरील घड्याळाचा ज्या दिवशी सेल बदलला कि ताबडतोब कॅलेंडर वर नमूद करायचं. म्हणजे जर तो सेल साधारणतः ४ महिने चालणार असेल तर आज पासून चौथ्या महिन्याच्या पानावर ती नोंद करायचे माझे बाबा दादा, म्हणजे त्या महिन्यात आवर्जून किराणाच्या यादित तो आणता येईल. आज सकाळी माझ्या घरच्या भिंतीवरच्या घड्याळाचा सेल बदलला तर त्यांची अनेक वर्ष पाळलेली शिस्त आठवली. त्याच बरोबर आमच्या घरी रेव्हिन्यू स्टॅम्प्स, इनलँड पत्र, पोस्ट कार्ड्स आणि पोस्टाची तिकिटे सगळ्याचा शिस्तीत साठा करून ठेवलेला असायचा आणि तो रिफील होत असे वेळोवेळी. अर्थात आता ह्या सगळ्या गोष्टींची जागा भलत्याच टेकनॉलॉजि ने घेतली आहे, त्यामुळे नवीन पिढीला तर हे सगळं माहित हि नसेल.
तसेच त्या वेळी मोबाईल, किंबहुना साधा डब्बा लँडलाईन फोन सुद्धा घरी नव्हता त्यामुळे पाहुणे रावणे न कळवताच येत असत, कधी लग्नाची / कार्याची पत्रिका घेऊन, काही नवीन जोडपे तर कधी लहान पिल्लू, कधी चांगला निकाल लागला म्ह्णून पेढे घेऊन आलेले विद्यार्थी आणि असे अनेक जण. त्यांना रिकाम्या हातानी पाठवायचं नाही हा माझ्या आईचा नेम. त्या करता ती पण अनेकविध देण्यासारख्या वस्तू, वयाप्रमाणे, प्रसंगाप्रमाणे संग्रह करून ठेवत असे ती आवर्जून. तिचा तो ठराविक कप्पा डोळ्यासमोर उभा ठाकला डोळ्यासमोर. अश्या छोट्या पण उपयुक्त आठवणी जाग्या झाल्या म्हणून म्हटलं लिहावं.
सोमवार, २४ मे, २०२१
शिस्त
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा