एक दिवशी माझा लहानपणीचा वेद शाळेतून आला एक मूठ घट्ट बंद करूनच. "काय आहे रे त्या मुठीत?" म्हटलं तर "काही नाही" बास एवढंच उत्तर मिळालं मला. त्यानंतर शाळेचे कपडे बदलतांना, हातपाय धुतांना, दूध घेतांना ती मूठ बंदच होती, सगळं एका हाताने चालू होत. मला पण सांगत नव्हता म्हणजे मला फारच आश्चर्य वाटलं. अनेकदा विचारून काहीच उत्तर देत नसल्यामुळे, दाखवत नसल्यामुळे मग मी पण शांत बसून वाट पाहायची ठरवली.
मग साधारणतः ७.३० - ८ च्या दरम्यान त्याचे बाबा आले ऑफिस मधून घरी आणि हा गेला कि धावत त्यांच्या कडे आणि म्हणतो कसा "बाबा हे घ्या पैसे", असं म्हणून त्याची छोटी मूठ उघडतो तर त्यात एक रुपयाचं नाणं होत जे त्याला सापडलं होत, "तुम्ही म्हणत होता ना कि मोठी गाडी मी नाही घेणार, पैसे नाहीत, हे पैसे घ्या आणि मो$$$$$ठी गाडी आणा, ओके". "मो$$$$$ठी ..." हा शब्द उच्चारतांना वेद च्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे दोन्ही हात पाठीमागे, आणि डोळे बंद.
वेद ची मो$$$$$ठी गाडी ची संज्ञा म्हणजे तिसरी रो असलेली गाडी = एस यू व्ही, इंनोवा, स्कॉर्पिओ अशी. बाबा हो म्हणाले त्या वेळी, वेद पण नंतर विसरला आणि तो विषय जरी तेथेच संपला असला तरी माझ्या स्मृतीत कायम आहे अजून,आवडली मला वेद ची कृती, त्याच्या छोटयाश्या मेंदूने केलेला विचार / मॅपिंग, अहाहा. भन्नाटच. लव्ह यू पिल्लू.
Listen to this Anukatha on https://youtu.be/6e3Leb9Swiw
Also find me on Twitter and Facebook too.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा