रविवार, ९ मे, २०२१

सुख म्हणजे नक्की काय असतं....

 मी स्वतःला एक भन्नाट खवैई समजते, आणि मला योग करायला, पहाटे फिरायला जायला खूप आवडतं. अर्थात जेवढं जमेल तेवढंच करते, नाहीतर पुन्हा पाय बोलायला लागतात.

योग-आसन उभे राहून, बसून, पोटावर झोपून आणि पाठीवर झोपून असे प्रकार असतात, ज्या पैकी एक प्रकार रोज करण्याचा मानस असतो माझा. मी जेव्हा जेव्हा माझ्या योग मॅट वर माझी पाठ टेकते तेव्हा तेव्हा मला "सुख म्हणजे नक्की काय असतं...." हे जाणवतच. काय जादू आहे जमिनीवर आडवं पडण्याची, त्या मॅट ची जी मी एका योग चॅलेंग मधे जिकली आहे, विकत आणलेली नाही. असं वाटत कि थोडा वेळ ते सुख, तो मायेचा वेगळा स्पर्श एन्जॉय करावं, बाकी आसन नंतर, पण तेवढा वेळ नसतो सकाळी, पण मी आवर्जुन धन्यवाद देते मनापासून त्या सगळ्या हातांना जे हे मॅट तय्यार करून माझ्या घरी पोचविण्यासाठी उपयोगी पडले.

अहाहा. भन्नाट रोजचा अनुभव आहे माझा. "थोडक्यात गोडी" म्हणतात तसं हे थोडंस चालणं, मग किंचित योग आणि अगदी काही काळ मॅट वर आडवं पडण्याचं सुख अनुभवलं कि मग दिवसभराच्या कामांना तयार स्वारी. असो. सुख म्हणजे नक्की अजून काय असतं....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...