का कुणास ठाऊक पण मला गेली कित्येक वर्ष एक सुप्त ईच्छा सतावते आहे. कुठलिही पैशाची अपेक्षा नाही, किंवा ते माझं क्षेत्र तर मुळीच नाही, मी ह्या आधी कधी केलं पण नाही, अनुभव तर नाहीच नाही पण मला तरीही एखाद्या मराठी / हिंदी सिनेमात किंवा टीव्ही सिरिअल मधे छोटंस काम करायचं आहेच. पुन्हा एकदा सांगते मला खरंच माहित नाही मला असं का वाटतंय ते.
मागील दोनेक वर्षांपासून आम्हाला आमचे छोटेसे शैक्षणिक व्हिडिओ तय्यार करायला सांगितले होते, ऑफिस मधे. मग मी माझे स्वतःचे पण २-४ व्हिडिओ केले त्यानंतर. अगदी बाळबोध आहेत, पण केले. मग एका दिग्गजांचा सल्ला मिळाला कि व्हिडिओ प्रेक्षकांना पोचतो ते लिखाण / कॉंटेन्ट्स आणि जो बोलतोय त्याचा चेहेरा बघून.
मग काय पुन्हा थोडेसे बाळबोध मी दिसेल असे व्हिडिओ केले तय्यार, पण अर्थात मला मनापासून आवडले नाहीत ते. अजून मला व्हिडिओ एडिटिंग शिकणे आवश्यक आहे,
आपण ह्या सगळ्या एक्सरसाईझ मुळे सिनेमात काम करण्याचं भूत जरा किंचित कमी झाल्यासारखं वाटतंय. असो, काय माझा एक एक वेडेपणा, देवा. "दुधाची तहान ताकावर" हे तंतोतंत जुळते आहे माझ्या बाबतीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा