बुधवार, २ जून, २०२१

अमृताहुनी गोड ....

आदरणीय माणिक वर्माजींच्या सुमधुर आवाजातले हे भजन, अभंग. माझ्या आईने देखील तिच्या काही भजनात हि संज्ञा वापरली आहे, तसेच अनेक लेखकांनी देखील. अमृताहुनी गोड .... देवाचे नाव आहेच आणि त्याची अनुभूती पदोपदी येतेच सर्वांना. त्या शिवाय हि संज्ञा चहा साठी पण वापरली जाते थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि स्पेशिअली महाराष्ट्रात अमृततुल्य असे. ह्या मागचं मला माहित असलेलं कारण म्हणजे चहा हा स्वस्त आणि मस्त, सगळ्यांना परवडणारा आणि एक तरारी देऊन जाणारे पेय. मजूर / गोर गरीब / कष्टकरी लोक ह्यांना तो अमूर्तासारखा वाटतो, भूक शमते, अधिक काम करण्याकरता उत्साह येतो ई.

गेल्या काही दिवसांपासून आमच्या घरी "वन डिश मील" चं वारं वाहत आहे आणि त्यामुळे पार्टी मज्जा सुरु आहे एकंदरीत. पार्टी म्हणजे तशी नाही हो. पार्टी म्हणजे बदल, आवडता बदल, हवाहवासा बदल, अनेक दिवसांनी केलेला बदल असं. गेले १५(+) एक दिवस तरी हे असेच सुरु असल्यामुळे आणि नेहेमीच्या "आमटी भात भाजी पोळी कोशिंबीर" ई. ला फाटा दिल्यामुळे काल थोडी गडबड झालीच. त्यामुळे आज मी लंघन करायचं ठरवलं, आणि अर्थात पूर्ण दिवस काम करायचं म्हणजे आणि थोडासा पोटाला आराम असे काही सोप्पे ठरवले खायचे. अर्थात माझं उत्कट प्रेम आहे "साधा वरण भात तूप मीठ" ह्या वर. मग काय संधी अनायस्या चालून आली होती, मग सोडते कि काय. बास ताबडतोब फोन आलाच पोटाचा धन्यवाद म्हणून आणि फार हलकं वाटलं अतिशय आवश्यक होत माझ्या साठी ते. आज हे कॉम्बिनेशन "साधा वाफाळलेला भात वरण तूप मीठ" मला अमृताहुनी गोड .... वाटल्याशिवाय राहील नाहीच. अहाहा. 

हे सगळं अर्थात मी माझ्या मुलांशी बोलत होते तेव्हा प्रकर्षाने जाणवलं कि खरं तर हा आपला संस्कार होता, विधिविशेष होता. महाराष्ट्रतात जेवण /  पंगत / वाढणं "वरण भाताची मूद तूप मीठ" ह्याने सुरु होत असे, अनेकदा शेवट देखील ज्यांना दहीभात ई. आवडत नाही त्यांच्यासाठी. हे काली डाळ, डाळ तडका आणि मसालेदार पदार्थ ह्यांना थारा नव्हता पानात. खैर असो. विसमूर्तीत गेलेलं आज आठवलं हे हि नसे थोडके.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...