बुधवार, २ जून, २०२१

वार्षिक स्नेहसंमेलन

माझ्या सख्या मामाचे कोल्हापुरात अतिशय प्रसिद्ध असे गणित आणि विज्ञानाचे वर्ग होते. अनेक वर्ष त्यांनी ते चालवले. ते इतके प्रसिद्ध होते त्या काळी कि त्यांना त्यांच्या क्लास च्या शेजारचा रिकामा प्लॉट भाड्याने घ्यावा लागला होता, सायकली पार्क करण्याकरता. अतिशय माफक फी, उत्कृष्ट शिकवण, मनापासून अतिशय आत्मियतेने सोप्या पद्धतीने शिकवणे ई.  ह्या करता तो क्लास फारच फेमस होता आणि राहिला अनेक वर्ष. आणि हो त्या काळी जेव्हा क्लास हि संकल्पना फारच नवखी होती.

वर्षभर मुलांना / विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर थोडासा विरंगुळा म्हणून  वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलं जायचं. नीट वाचा मंडळी. त्या क्लास ची प्रसिद्धी इतकी होती, कि कलासचे वार्षिक स्नेहसंमेलन, इन्स्टिटयूट किंवा युनिव्हर्सिटी चे नाही बरं का. अनोखं होत सगळं. अर्थात हे सगळं जे मी आज लिहिते आहे ती सगळी ऐकिव माहिती आहे, कारण त्यावेळी मी अतिशय लहान होते. हा माझा अनुभव नाही, किंवा स्मृती नाहीत, पण असायला हव्या होत्या असं प्रकर्षाने अनेकदा वाटत मला. असो.

तर दरवर्षी ह्या वार्षिक स्नेहसंमेलना साठी दिग्गज व्यक्तींना आमंत्रण दिल जात असे. त्या व्यक्ती दिग्गज असूनदेखील सहज येत असत कारण त्यावेळी सहज सोप्प होत सगळं, माणसं साधी होती, आणि करमणूकीची साधनं म्हणजे गाण्याचे कार्यक्रम, नाटकं, थोड्या प्रमाणात सिनेमा, बास. एकापेक्षा जास्त वेळा आदरणीय माणिक वर्मांचा गाण्याचा कार्यक्रम झाला होता आमच्या कडे. काय लकी ना ते विद्यार्थी, माझ्या घरचे, सर्व ऐकणारे, अर्थात मी सुद्धा (अगदी बाळ होते, पण सुमधुर स्वर पडलेच ना नकळत कानावर). आई सांगते अगदी पहाटे पर्यंत चालत असे महेफ़िल. अहाहा. भला मोठा स्टेज, मोठाले दिवे, रेकॉर्ड करणारे कॅमेरे काहीही नव्हते तेव्हा, आणि गरज पण नव्हती कोणालाच, ना हि कलाकाराला ना हि आयोजित करणाऱ्यांना ना हि प्रेक्षकांना. ते स्वर, त्या स्मृती हे सगळं जास्त महत्वाचं होत. कलाकारांच्या तारखा सहज मिळत असत आणि सेवा ह्या दृष्टीने बघितलं जात असे. कलाकारांना फारच थोडं मानधन मिळत होत, कारण ते जास्त महत्वाचं नव्हतंच. आताच्या पिढीला थोडं अवघड आहे समजायला कारण एक साधी सतरंजी, थोड्या गाद्या आणि काही लोड लागलेच तर टेकायला एवढं अंथरलं कि कार्यक्रम सुरु. आणि ह्याला वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं जायचं. काय होते ते दिवस. काळ फारच बदलला. अर्थात प्रवाहपतीत होणं अनिवार्य आहेच. पण ह्या स्वरबद्ध, अप्रतिम, साध्या पण अमृततुल्य अश्या आठवणी चिरंतन राहणार ह्यात शंका नाहीच.

हा माझा छोटेखानी पंक्ती प्रपंच जर सहज त्या काळच्या एखाद्या जरी विद्यार्थ्यांच्या वाचनात आला तरी मला संपर्क करा, विनंती आहे  माझी, मला अजून अश्याच अनेक गोड आठवणी ऐकायला मनापासून आवडेल नक्कीच.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...