बुधवार, २ जून, २०२१

आनंदाचे डोही आनंद तरंग...

असं होतंय माझं काल पासून. का? सांगते.

सरते शेवटी काल उशिरा संध्याकाळी जाहीर झालं कि एकदाच्या १२ च्या परीक्षा नाही घेतल्या जाणार, सद्यपरिस्थितीमधे. फारच हायसं वाटलं, निर्णय ऐकल्यावर. १२ ची परीक्षा नाही घेत आहेत म्हणून मला आनंद नाही झालाय मंडळी, पण निर्णयाची वाट सगळेच बघत होते, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण संस्था ई. तो मिळाला काल, मोकळं वाटलं. मुलांनी अगदी मान मोडेस्तोवर अभ्यास केला होता महत्वाचं वर्ष म्हणून. "गंगेत घोडं न्हायल" एकदाच. काल कोणीतरी टीव्ही वर म्हटलं कि १० लाख विद्यार्थी म्हणे ह्या निर्णयाची वाट बघत होते. बिनडोक म्हणेन मी त्यांना, सॉरी, पण १० लाख विद्यार्थ्यांसोबत २० लाख पालक, ४-५ लाख शिक्षक, अनेक ग्रॅज्युएट डिग्री देणाऱ्या संस्था ई. सगळेच वाट पाहत होते. असो.

थोडंस विषयांतर करते. माझ्या प्रेग्नन्सी वेळी माझी एक डॉक्टर देखील प्रेग्नन्ट होती. मला आणि तिला एकसारखीच काळजी होती, कशी असतील बाळ, वाढ नीट होत असेल ना? ई. डिलिव्हरी नंतर स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर हायस वाटलं एकदाच, मोकळं वाटलं, दोघींना.

तसेच माझी PhD झाली तेव्हा पण अनेकांनी हा साहजिक प्रश्न विचारला, आता कसं वाटतंय?, म्हटलं "डिलिव्हरी झाल्यासारखं". काल पण पुन्हा एकदा तो च अनुभव आला, सुटले एकातून असं काहीस.  आता पुढचा विचार करायला मोकळे, अधांतरी नाही, टांगती तलवार नाही, ई.

अर्थात कुठलिका असेना, डिलिव्हरी झाल्यावर एक मोठं काम होत, पण त्या नंतरची आवाहनं तितकीच भली मोठी असतातच ना?

नेहेमीचे नॉर्मल दिवस असते तर मी काल एकदाचा निर्णय कळल्याबरोबर आज "माझ्या बकेट लिस्ट" मधल्या गोष्टी करायला ताबडतोब सुरवात केली असती उत्साहात, आता थोडं थांबणं हिताचं आहे. माझी सारखी घोकंपट्टी चालूच असायची, १२ वी ची दोघांची परीक्षा झाली कि मी हे करणार ते करणार, मोठी यादीच होती आणि आहे. पण घरबसल्याबसल्या त्या यादीतले ऑनलाईन करता येण्यासारख्या गोष्टी करतेच. बास आता. खूप झालं वाट पाहणं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...