आज च्या वर्तमान पत्रात दिमाखात एक फोटो छापून आला आहे. त्यात एक छोटी मुलगी दुकानाच्या काउंटर वर उभी केली आहे, कारण तिचे वडील तिला रेनकोट घालून बघत आहेत. देवा. मी तर अक्षरश: निशब्द झाले तो फोटो बघून.
ह्या भयानक काळात जरी दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी परिस्थती अजूनही निवळली नाही, बाहेर पडणं धोक्याचं आहेच. त्यात अश्या ३-४ वर्षाच्या मुलीला घेऊन... म्हणजे काय बोलायचं. सध्या सगळेच घरी आहेत, शाळा बंद आहेत आणि अश्या छोट्या मुलांच्या शाळा इतक्यात सुरु नाही होणार हे सगळ्यांनाच माहित आहे, मग का?
व्हाट्सअप वर व्हायरल झालेला निरोप आहे मेडिकल तज्ज्ञांकडून कि सद्यस्थिती प्रेस्क्रिप्शन काय तर "फेविकॉल लावून घरी चिटकून बसा, बाहेर अजिबात पडू नका, ज्यांना गरज नाही त्यांनी". आता हे रेनकोट घेणं काय गरजेचं आहे, ऑनलाईन घरबसल्या मागवता येतो ना, काहीही म्हणजे काहीही विचित्र करत बसायचं. राग येतोय मला.
अगदी आवश्यक वस्तू विकत घेण्यास देखील बाहेर जायची गरज नाही, सगळं घर बसल्या मिळतंय आता. प्लिज. कृपा करा. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे सकाळ सारखा पेपर हे छापून आणतोय, हद्द आहे. पोलीस किती आणि काय काय बघणार हो, प्रत्येकाने त्यांची स्वतः ची काळजी घ्यायला नको. जबाबदारी आहे हि प्रत्येकाची. आशा करते कि सगळे म्हणजे सगळे जण आपआपली काळजी नीट घेतील, अगदी थोडे च दिवस, हे दिवस पण लवकरच निघून जातील.
बुधवार, २ जून, २०२१
खरेदी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा