हा प्रश्न माझ्या लाडक्या मुलाने परवा मला विचारला आणि तो मला व्यवस्थित समजावून पण सांगत होता.
"हे बघ मम्मा, समजा आपण रमी खेळलो, डाव संपला आणि प्रत्येक खेळाडूच्या हातात पूर्ण किंवा अपूर्ण sequence तय्यार झाले आहेत. मग ते पुढच्या डावात तसेच तय्यार sequence हातात परत येऊ नये म्हणून तर आपण पत्ते पिसतो, बरोबर. पण मम्मा (आता तरी सवय फार कमी झाली आहे नाही तर चिरंजीव प्रत्येक वाक्यात हजार वेळा मम्मा म्हणायचे आधी लहान असतांना, असो), समजा आपण पत्ते एकत्र केले डाव संपल्यावर आणि मग ते तस्सेच एक एक प्रत्येक खेळाडूला वाटले नेहेमी सारखे तर उलट तय्यार झालेल्या sequence मधला एक एक पत्ता प्रत्येकाला येईल, वाटला जाईल आणि त्यामुळे तेच साधलं जाईल जे पत्ते पिसून मिळत. बरोबर? मग का पिसायाचे पत्ते? उगाचच वेळ वाया आणि "नीट पीस हं", हे पण ऐकायला नको, ते दोन भागात करून बोटांच्या कवायती करून एकमेकात चपराक मिसळतील असे काही नक्कोच.
"चला तर मग आजपासून न पिसता खेळून बघुयात" असं म्हटलं, प्रयोग केला आणि खरंच मज्जा आली, काही तरी घरच्या घरी एकत्र quality time घालण्याकरता चालण्यासारखं आहे. छोटी पण नवीन गोष्ट शिकायला मिळाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा