रविवार, १३ जून, २०२१

अशक्य आणि अवघड

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही हे नवीन दिवस सुरु झाल्यापासून अमूल च टेट्रा पॅक मधलं दूध घेतो, म्हणजे रोजचा दूध वाल्याचा संपर्क नको आणि स्वतः पण रोज बाहेर जायला नको दूध आणण्याकरता. एक लिटरचे पॅक घेऊन येतो बरेच दिवस चालतात. आज पर्यंत कधी वापरले नव्हते पण सुरु केलेत. असो. तर आमच्या हुषार मावशी एक दिवस काहीतरी फ्रिज मधे बऱ्याच वेळ खुडखूड करत होत्या, अथक प्रयत्न करत होत्या आणि ते असफल पण होते. मी हॉल मधे बसून महत्वाचं काम करत होते त्यामुळे मला समजत होत काही तर गडबड आहे पण मी न उठण्याचं ठरवलं, म्हटलं बघू नंतर.

त्या दिवशी मी मस्त झकास खीर केली होती आणि फ्रिज मधल्या टेट्रा पॅक मधे अगदी एखाद कप किंवा त्याही पेक्षा कमी दूध होत,जे थंडगार होत. म्हणून मी नवीन पाकीट उघडलं आणि वापरलं. पण दुसऱ्या पाकिटातील पण थोडसच दूध उरलं खीर झाल्यावर. ते दुसरं पाकीट कामाच्या घाईमुळे ओट्यावर तसंच राहील. मावशी आवरताना ते दुसरं दुधाचं पाकीट / टेट्रा पॅक फ्रिज मधे ठेवायला गेल्या. फ्रिज च्या दारात उभं राहावं म्हणून दूध ठेवते मी, आणि त्याच्या आजूबाजूला जॅम च्या बाटल्या आहेत, केचअप आहे, पीनट बटर आहे, ई. तर आमच्या हुशार आणि उत्साही मावशी त्या भरलेल्या दाराच्या खाण्यात हा दुसरा दुधाचा पुडा / टेट्रा पॅक बसवण्याचा जोरदार आवाजकरत प्रयत्न करत होत्या.

नंतर बघितल्यावर माझ्या सहज लक्षात आलं, त्यांना जॅम ची किंवा पीनट बटर ची बाटली काढून दुसरीकडे ठेवता आली असती. त्या टेट्रा पॅक ला उचललं कि समजत कि किती दूध शिल्लक आहे ते, त्या ते दूध एका कपात काढून ठेऊ शकल्या असत्या आणि अजून बरेच मार्ग होते. पण नाही, ते काही त्यांनी केलं नाही. का? कोणास ठाऊक. अर्थात हे मी त्यांना समजावून सांगायला गेले नाही, विचारलं तर मुळीच नाही, असो. पण त्यामुळे हि छोटी अनुकथा लिहिता आली ना. छोट्या छोट्या गोष्टी पट्टाकिनी लक्षात येण्याकरता पण "त्याची" कृपा हवीच आणि त्या करता रोज, न चुकता हात जोडले पाहिजेत काही क्षणा पुरते. बरोबर कि नाही मंडळी?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...