रविवार, १३ जून, २०२१

मास्क च्या आतला विसरलेला चेहेरा & dimensions

परवाच माझी एक मैत्रीण म्हणाली, ती इतक्यातच जॉईन झाली आहे ऑफिस मधे. ती म्हणाली "मॅडम मी तर सगळ्यांना मास्क मधेच जास्त चांगलं ओळखते, कारण मी जॉईन झाल्यापासून फक्त डोळे ओळखीचे दिसतात, चेहेरा बहुतेक बघितलेलाच नाही". अगदी खरं आहे, आणि त्यात ऑफिस मधे तर जास्त काळजी घेतली जाते, बहुतेक सतत मास्क असतोच घातलेला. असो. परवा मी जरा दमले होते आणि मोकळा श्वास घ्यावा असं प्रकर्षाने जाणवलं, त्यामुळे तो भाला मोठा जाडजूड मास्क काही क्षण बाजूला केला, पाणी प्यायले आणि बसले. तेवढ्यात माझी एक जुनी मैत्रीण आली अचानक आणि म्हणते कशी "मॅडम काय झालाय तुमच्या गालांना?" मी घाबरले, "म्हटलं काही नाही", "अहो कित्ती सुजलेत". बापरे मी उडालेच. म्हटलं "अहो आपण मास्क शिवाय खूप खूप महिन्यांनी बघतोय म्हणून तुम्हाला वाटतंय तस्स आणि अर्थात ह्या लॉक डाउन मुळे, घरच ताज गरमागरम विविध्य खाणं मिळाल्याचं लक्षण आहे ते, वजन वाढल्याचं थोडक्यात, करते कमी लवकरच". असं म्हणून आमचा छोटासा पण उपयुक्त असा संवाद संपला आणि ह्या अनुकथेचा जन्म झाला. त्या काळजी पोटी म्हटल्या पण मला काही तरी करायला हवंय. मास्क ज्या दिवशी थांबेल वापरायचा तेव्हा सगळेच चेहेरे थोडे बदलेले वाटतील नाही. असो. हा दिवस पट्टाकिनी येऊ दे रे देवा. आमेन. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...