रविवार, १३ जून, २०२१

भन्नाट दही तय्यार करणारा फ्रिज


तंत्रज्ञानाने आणि संशोधकांमुळे काय काय ऐकायला, वापरायला आणि चाखायला मिळेल हे काही सांगता येत नाही. माझी दाही बोटं तोंडात गेली जेव्हा मी एका नवीन वस्तू बद्दल ऐकले. माझ्या लहानपणी पासून मी पाहिलं आहे आणि कृती केली आहे घरीच दही लावण्याची. कधी म्हणजे कधीच मला माहित नव्हतं किंबहुना त्या काळी घरी सतत दही असायचंच, ते संपायच्या आत नवीन दही लावणं हे एक काम होत, रेगुलर काम. छोटी पण ती पण एक कला होती कारण ऋतुमानानुसार दुधाचं तापमान फार महत्वाचं असायचं परफेक्ट दही तय्यार होण्यासाठी, आणि हो त्या गरमसर दुधात किती दही घालायचं ते हि महत्वाचं हो. आपल्याघरी किंवा शेजारी दही लावण्यास किती आणि कधी दही द्यायचं / द्यायचं-नाही हे हि अलिखित नियम पाळले जायचे सगळ्यांकडून. काय मस्त आठवणी आहेत ह्या माझ्या. अहाहा.

२००० साली माझी रवानगी सासरी झाली आणि मी उडालेच, अर्थात सुखद धक्का होता तो,  कारण दही हे चक्क एका डेअरी  मधून विकत आणले जायचे. मग अमेरिकेत तर कहर झाला कित्ती म्हणजे कित्ती वैविधता होती, प्रचंड स्वादात दही मिळायचं आणि प्रकारात पण. साय काढलेल्या दुधापासून केलेलं, साखर न घालता पण गोड, विविध फळांच्या स्वादाच, देवा. अर्थात आता इथे पण सगळे उपलब्ध आहेत.   

आज ह्या दही प्रकरणात एक भारी भरकम भर पडली,  "सॅमसंग कर्ड मास्ट्रो" नावाची. असा एक फ्रिज आहे, थंड तापमान जपून ठेवणारा फ्रिज आणि तो भन्नाट दही तय्यार करतो, दोन प्रकारचे, घट्ट आणि नॉर्मल म्हणे. बापरे. फक्त कोमट दूध घाला, थोडेसे दही आणि बटन दाबा, काही तासात ३-४ दिवस टिकणार दही तय्यार. मी गारच पडले हे ऐकून, वाचून आणि बघून. माझ्या तर आकलना पलिकडले आहे हे सगळे. फ्रिज मधल्या एका कप्याचं तापमान त्यांना वेगळं मेनटेन करावं लागत असणार. ह्यालाच इनोव्हेटिव्ह आणि टोटली आऊट ऑफ दि बॉक्स थिंकिंग म्हणावं लागेल. विचार आहे माझा जुना फ्रिज बदलायचा ह्या नवीन मित्राचा विचार करायला हरकत नाही.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...