शुक्रवार, ११ जून, २०२१

स्निग्धजन्य परतफेड ... (भाग १७)

 स्निग्धजन्य परतफेड ... (भाग १७)

सद्य स्तिथीत मी अनेकविध स्निग्धजन्य वस्तू वापरत आहे, दिवसभर पण थोड्या प्रमाणात. सर्वप्रथम दिवसाची रम्य सुरवात तव्यावरच्या तूप गूळ पोळीनी होते. हे सर्व घटक पदार्थ अत्यन्त गुणकारी असतात आणि ते मी विसरली होती म्हणून कि काय हे सत्र सुरु झालं नव्याने, कित्येक वर्षाने आणि चाललंय.

जेवणात प्रामुख्याने विविध भाकरी सामावल्या आहेत आणि त्यावर तूप नाही घेतल तर मग काय..

त्यानंतर अधेमधे वैविध्य लाडवातून पोटात जाणारे तूप.

सकाळी आंघोळीच्या आधी डॉक्टर च्या सल्या प्रमाणे अर्धा तास एक प्रकारचे तेल लावायचे / जिरवायचे "शीरबला तेल", शिरांना बळ येण्यास. रात्री झोपायच्या आधी लावण्याचे नारायणी तेल. कधी पाय दुखलेच तर Dr. Ortho हे तेल. माझ्या Acupressure डॉक्टर ची भिस्त नारळाच्या तेलावर आहे.

देवा... इतक्या सगळ्यांची परतफेड कशी कधी करायची? का थोडक्यात हे सत्र चालू ठेवणे म्हणजे परतफेड असं बघायचं ....

Dec 30, 2018, 8:38 PM, wrote this on FB Wall.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...