टीव्ही वर प्रसारित होणारे क्रीडा प्रकार
विरंगुळा, व्यसन, उपयोग, का ...?
बरीच वर्ष टीव्ही ह्या बहू
आयामी माध्यमातून अनेक देशो विदेशीचे क्रीडा प्रकार बघायला, अनुभवायला, अचंबित व्हायला आणि
शिकायला पण मिळतात. टीव्ही हे एक प्रचंड उपयोगी माध्यम आहे आणि गेल्या काही वर्षां पासून माझ्या मते डिश टीव्ही आल्यापासून अनेक वाहिनीच्या चढाओढीमुळे खूपच मनोरंजनात्मक दुर्मिळ अश्या गोष्टी घर बसल्या बघायला मिळतात. काही टीव्ही वर नावाजलेले क्रीडा प्रकार / कार्यक्रम म्हणजे क्रिकेट, टेनिस, हॉकी, फुटबॉल इत्यादी. पण जे आजकाल पेव फुटलय ते कितपत योग्य आहे, का त्याला आवरण घालणे आवश्यक आहे ह्याची नोंद कोणी तरी घेतली तर बर होईल. क्रिकेटचेच असंख्य matches, हा कप तर तो कप. कंटाळा कसा येत नाही कोणास ठाऊक, सगळ्यांनाच, पाहणाऱ्यांना विशेतः महद आश्चर्य वाटतं मला. बर गेल्या एक दोन वर्ष पासून काय तर कबड्डी, महिला क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, ऑलिंपिक, lawn टेनिस, कुस्ती, आणि हि यादी काही न संपणारी आहे. बर हे सर्व प्रसारण डोळ्यांच्या पापण्या न हलवता बघून किती जण उतरले हो मैदानात?. अरे ते जाऊ दे, किती जण त्यातून प्रेरणा घेतात, आणि त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काही कामगिरी करतात, घरात मदत करतात, दुप्पट उत्साहात काम करतात, खिलाडू वृत्ती निर्माण करतात आणि ते जोपासतात. मग हे सर्व नाही जमत तर फुकट वेळ का घालवायचा? बर अस हि नाही कि कधी तरी एखाद्या दिवशी महत्वाची क्रीडा match बघितली आहे, सर्वांच्या सर्व बघायच्याच, त्यानंतर प्रसारित होणारे highlights हि बघायचे, ते कमी होता म्हणून मोबाइलला वर त्यावरची चर्चा रंगवायची, बोलायची ...
अरे
काय
हे.
व्यसनांच्या पलीकडील आहे
हे.
आणि
ह्या सर्व गलेलठ्ठ क्रीडा क्षेत्र बद्दल खूप
काही चांगला वाचायला मिळत नाही, पैसे लावणं, सट्टा, जुगार वगैरे चालतो म्हणे. २०-२० मध्ये मुलींचा नाच काय.... म्हणजे एकंदरीतच अधोगती. काही नावाजलेल्या चित्रपटात सुद्धा बरच दाखवला आहे. अशा थराच्या गोष्टी विविध वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या मालिकां मुळे तर होत नसाव्यात / होत नाहीत कधीच.
निष्कर्ष असा कि समतोल राखा. टीव्ही हे अत्यन्त उपयोगी माध्यम आहे, प्रेरणा घ्या, सुदृढ व्हा, "अती तेथे माती" होणार नाही ह्यची खबरदारी घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा