अगदी बरोबर वाचलत मंडळी. काही संशोधकांनी अनेक प्रयोग केले. फळांच्या काही झाडांखाली अप्रतिम, सुदींग संगीत लावलं / वाजवलं काही काळापुरती आणि काही दिवस असं. त्याच शेतात बाकी उपलब्ध असलेल्या फळांच्या झाडांसोबत हा प्रयोग नाही केला. त्या शास्त्रज्ञांच्या प्रयोगानुसार आणि त्यांना जे रिझल्ट्स मिळाले त्या नुसार असं आढळलं कि संगीत ऐकलेल्या झाडांना फळे जास्त आली, ती अप्रतिम दर्जाची होती, ती जास्त गोड होती ई. त्याच वेळी बाकी झाडांना नेहेमी सारखी नॉर्मल आकाराची, चवीची फळे आली काहीही बदल दिसला नाही. ह्या आणि बाकी इतर अनेक प्रयोगातून हे सिद्ध झालाय कि झाडांना ऐकू येत, त्यांना पण भावना असतात आणि ते देखील रिऍक्ट करतात. का नसणार? शेवटी ते देखील सजीव आहेत ना.
आपला देश हा एक "अंडर कन्स्ट्रूक्टशन" देश आहे, जेथे नजर जाते तेथे सतत काही ना काही बांधकाम चालूच असत. आमच्या शेजारी पण एक असेच बांधकाम चालू आहे आणि काल तर त्यांनी कहर केला. आजकाल स्कॅफोल्डिंग लोखंडी वापरतात, म्हणजे बांधकामापुरतं ते लोखंडी रॉड्स वापरून फटाफट स्ट्रक्चर तय्यार होत. काल एक ट्रक भर ते लोखंडी बार आले आणि ते जोरात फेकत होते. त्याचा इतका भयानक आवाज येत होता, अनेक तास, मग मी जाऊन त्यांना विनंती केली पण काय "पालथ्या घड्यावर पाणी", का$$$$ही उपयोग झाला नाही.
तेव्हा मला हे जाणवलं कि माणसं विनंती तरी करू शकतात पण आजूबाजूला असलेल्या झाडांचं, प्राण्यांचं, पक्षांचं, आजी-आजोबा तान्ह्या बाळाचं काय? बांधकाम वाल्यांनी बेधुंद आवाज करायचं त्यांना वाटेल तेव्हा आणि बाकीच्यांनी गप्प ऐकायचं? का? काही उपाय नाही का ह्या वर? झाडांना काय वाटत असेल कि "अरे हि शिकली सावरलेली माणसं म्हणे, पण वागण्याची काही तर्हाच नाही, दुसऱ्यांची सोडा हो पण स्वतःच्या कानांची काळजी पण नाहीच". आणि आजकाल वेळ नाही काळ नाही अगदी पहाटे पासून, रात्री उशिरा पर्यंत काम चालूच, रविवार पण नाहीच, डेडलाईन्स, घाई, पैसा मिळवण्याची घाई ई. असतील त्यांना देखील. क्षमा करा मुक्या प्राण्यांनो, झाडांनो, मी काहीच करू शकत नाही ह्या बाबतीत. फार फार वाईट वाटत पण, सतत बांधकाम. ह्यालाच प्रगती म्हणतात का? कुणास ठाऊक.
शुक्रवार, ११ जून, २०२१
झाडांना कान असतात
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा