कालच्या सप्तरंग पुरवणीत पु. ल. बद्दल चा लेख वाचण्यात आला. त्यात काही प्रसंग वाचून डोळे भरून आले आणि मी पुन्हा एकदा निःशब्द झाले ...
पहिला प्रसंग आणि
त्यात लॅपटॉप चे मराठी नाव पु. ल. नी सुचवलेलं इतकं भन्नाट आहे कि भलतेच, "अंगणक": मांडीवर ठेवून काम करता येतं आणि सहज सगळीकडे नेता येतं असं शक्तिमान यंत्र.
माझ्या एक वहिनी मोबाइलला "अवयव" असच म्हणतात. मला असं वाटत कि अंगणक हि त्यातच मोडतं, आपण अवयव ची काळजी घेत नाही तितकी अंगणक आणि मोबाईल ची घेतो. हे आधुनिक काळात ले "अवयव" बाजारात सहज आणि चांगले मिळतात, पण मूळ अवयव....
Read more on:
https://www.esakal.com/saptarang/sarvottam-thakur-write-p-l-deshpande-article-saptarang-153240
"शेवटच्या आजारपणातही त्यांची स्मरणशक्ती जशी
तल्लख होती, तशीच त्यांची विनोदबुद्धीही तेवढीच जागृत होती. एकदा दिनेश घरी
लॅपटॉप घेऊन आला. कॉम्प्युटरला मराठीत संगणक म्हणतात. "लॅपटॉपला मराठीत काय
म्हणणार,' असं
आमचं संभाषण सुरू होतं, तेव्हा पुलं पटकन म्हणाले "अंगणक!' कारण, लॅपटॉप आपण
आपल्याबरोबर कुठंही घेऊन जाऊ
शकतो ना...!"
Updated Nov 5, 2018, 9:32 PM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा