रविवार, १३ जून, २०२१

... कंदील ...

बऱ्याच आठवणी आहेत ह्या शब्दाच्या. काही निवडक आठवणी, ह्या शब्दाचा वैविध्य प्रयोग कसा केला जातो, आणि नवं-नवीन प्रकारचे कंदील बाजारात वापरात आहेत त्याबद्दल थोडेसे.

माझी कंदिलाच्या काचा साफ करणं, त्यात रॉकेल भरणं, वात घालणं वगैरे बरीच आणि नेहेमीची कामे होती. मज्जा यायची खरंच. साफ झाल्यावर आणि स्वछ प्रकाश पडल्यावर खूप आनंद वाटायचा. दिवे गेले तर कंदिलाचा वापर व्हायचा, मेणबत्ती बरोबर. रॉकेल हि सहज उपलब्ध होतं.

दिवाळीचा आकाश कंदील हा एक अजून प्रकार जो अजूनही अस्तित्वात आहे, लहान, मोठे, कार्यानुभवातून तयार केलेले... अनेक.

ज्यांच्या चष्म्याचा नंबर जास्त असायचा त्याला हि कंदील असं संबोधायचे.

आता सूर्य उर्जेवर चालणारे कंदील आलेत, छोटे, सुंदर, देखणे. खूप उपयोगी घरी, दारी, प्रवासात...

मेणबत्त्या आत ठेवलेले, भिंतीवर टांगायचे विद्युत कंदील, सैनिकांनी वापरण्याचे कंदील आणि बरेच प्रकार ....

Nov 5, 2018, 9:07 PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...