रविवार, ६ जून, २०२१

तुझं घर ....

एक घडलेली गोष्ट ऐकली एवढ्यातच. एक मुलगी आहे, तिला पहिली मुलगी आहे साधारणतः - वर्षाची. ती नवरा आणि मुलगी हे बाहेर देशात राहायचे. दुसऱ्या बाळंतपणची वेळ आली तेव्हा नवरा म्हणाला कि तू "तुझ्या घरीच जा...". त्यानुसार तिच्या आईकडे आली, दुसरी मुलगी झाली. आई बाबा एकटेच असतात भारतात. त्यांनी दवाखान्यात नेणे, वेळोवेळी दवाखाना, मोठ्या मुलीबरोबर वेळ घालवणे असं सगळं केल. दवाखान्यात सासूबाई बघायला आल्या तेव्हा आई म्हणाली आता "तू तुझ्या घरी जा...". दवाखान्यातून सुट्टी झाल्यावर ती सासूबाई कडे गेली. एवढ्यातच नवरोजींचा फोन आला कि ह्या देशात माझी खाण्याची तारांबळ होत आहे, तू लवकर ये. आणि सासूबाई पण तो फोन ऐकून म्हणाल्या तू "तुझ्या घरी जा...". हे सगळं ऐकून मला छान वाटलं. म्हणजे एका मुलीचे तीन घर असतात ह्या विभक्त कुटुंब पद्धतीत लग्न आणि आई झाल्यावर. आणि असाही प्रश्न मनात आला कि मग नक्की तीच घर कुठलं?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...