आज मला एक नवीन माहिती मिळाली, खरंच मी अनभिन्न होते. अजिबातच माहित नव्हतं मला ह्या बद्दल. नवीन पण फारच महत्वपूर्ण माहिती माझ्या साठी. नवीन अर्भकासाठी मोहरीची उशी वापरायची असते म्हणे. त्यामुळे डोक्याचा आकार गोल राहण्यास मदत होते, डोक्यातील रक्त प्रवाह नियमित चालू राहतो वगैरे. झरक्कन बाकी मसाले आणि दाणे माझ्या डोळ्यासमोर आले, कि अजून कुठले मसाल्याचे पदार्थ का नाही वापरात. कदाचित मोहोरीच्या दाण्याच्या छोट्या आणि गोल आकारामुळे असेल. हळीव चालेल का? विचारलं पाहिजे कोणाला तरी. हि उशी घरी पण तयार करता येते आणि विकतही मिळते. विकत मिळणाऱ्या काही उश्या मला online
सापडल्या. खूपच गोंडस दिसतात.
माझ्या माहिती प्रमाणे खर गरज नसते किंवा नवीन बाळाला उशी देतच नाहीत, फक्त छोटे लोड ठेवतात दोन्ही बाजूला झोपतांना, कदाचित पडू नये, घसरू नये म्हणून असेल. पण बाळासाठी उशी हे नव्याने समजले.
Read more about this specially designed pillow on: https://www.firstcry.com/baby-bedding-sets-and-pillows/mustard-seed-infant-pillows?cid=8&scid=65&type=t1-5915
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा