गुरुवार, १० जून, २०२१

आवरासावर

का कुणास ठाऊक पण मला बरीच गिफ्ट / भेट म्हणून कानातली (खोटी) मिळतात. मी हि घेते अधून मधून, रंग बिरंगी खोटी कानातली. अस करता करता माझ्या कडे बराच साठा झालाय कानातल्यांचा. पण सवई प्रमाणे किंवा रोजच्या घाईमुळे खूप नीट नाही ठेवता येत मला तो साठा. ह्या सुट्टीच्या मोसमात काल ठरवलंच कि सहज सापडतील, जोडीने ठेवता येतील अशी काहीतरी उपाय योजना करावी घरच्या घरी. आणि मग माझ्या चार डोळ्यांना एक सुंदरसा डब्बा आढळला, एक जाड पाकीट हि सापडल आणि मग काय हा हा म्हणता अप्रतिम खाण्याची पेटी तय्यार झाली. मग माझ्या सर्व कानातल्यांची आवरासावर केली, काही विजोड झाली होती, काही जुनी वाटत होती .

त्या नंतर पाळी होती माझ्या आवडत्या पर्स ची. मोठ्या तुन छोट्या पर्स मध्ये सामानाची हलवा हालव केली, नको त्या (असंख्य बर का) गोष्टी काढून टाकल्या आणि आता हलकी फुलकी पर्स तय्यार आहे.

अशीच साफ स्वच्छता सर्व स्थरावर (मानसिक, शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, काल्पनिक, आणि ...) वेळोवेळी व्हायला हवी नाही का?

चला तर मग मंडळी लागा बिगी बिगी कामाला आणि स्मार्ट पद्धतीने पण थोडक्यात तय्यार होऊ यात नवीन वर्षाचे स्वागत करायला.

२०१९ ह्या (दिनदर्शिके-प्रमाणे) येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

Dec 30, 2018, 11:32 PM on FB.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...